मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत तब्बल २ लाख ९१ हजार ०८७ मतदार वाढले आहेत. मुंबईत यंदा १ कोटी २ लाखाहून अधिक मतदार आपले मत नोंदवणार आहेत. मतदारांची संख्या वाढली असली तरी मतदानाचा टक्का वाढवण्यात प्रशासनाला यश येणार का हे मात्र मतदानाच्या दिवशीच समजू शकणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत सुमारे ४७ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढणार का याबाबत उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही तास शिल्लक असून सोमवारी प्रचार थांबला. सोमवारी मुंबई महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी भूषण गगराणी यांनी पालिका मुख्यालयात निवडणुकीच्या तयारीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यंदा निवडणूक आयोगाने प्रथमच मुंबई महापालिका आयुक्तांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निवडणूक पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी मुंबई महापालिका प्रशासनावर आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मतदान व मतमोजणीच्या तयारीबाबत माहिती दिली. मुंबई महापालिकेचे तब्बल ६० हजार कर्मचारी, अधिकारी तर पोलीस दलातील २५ हजार ६९६ कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारपासून मतदान केंद्रावरील पथके रवाना होतील, असेही त्यांनी सांगितले. मुंबईत एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?
Delhi Elections 2025
Delhi Elections 2025 : भाजपाला २६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची तर काँग्रेसला चमत्काराची आशा; दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’समोर सत्तेत आल्यापासून सर्वात मोठे आव्हान
भाजपाला दिल्ली दूरच... आपने दशकभर वर्चस्व कसं राखलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाला दिल्ली दूरच… ‘आप’ने दशकभर वर्चस्व कसं राखलं?

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीनिमित्त एसटीच्या नऊ हजार बस धावणार

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. त्यावेळी निवडणुकीच्या नियोजनाबाबत सर्व स्तरातून टीका झाली होती. त्यामुळे यावेळी सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रतीक्षालय, रांगा लागल्यास बसण्याची व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, रॅम्प, मदतीसाठी दिव्यांगमित्र स्वयंसेवक, मदैनाच्या ठिकाणी मंडप, कचरापेटी, पंखे, पुरेशी प्रकाश व्यवस्था याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मतदान केंद्रावर एका वेळी चार मतदार…

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, तशा यावेळी लागू नयेत म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे. लोकसभेच्या वेळी मतदान केंद्रावर एका मतदाराचे मतदान पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मतदाराला आत घेतले जात होते. त्यामुळे वेळ लागल्याचा अंदाज आहे. त्यामुळे यावेळी मतदान केंद्रावर पाच कर्मचारी असतील. मतदानापूर्वीची ओळखपत्र पडताळणी, बोटाला शाई लावणे या प्रक्रियेसाठी वेळ वाया न घालवता एका पाठोपाठ एक असे चार मतदार आत असतील असे नियोजन करण्यात आले आहे.

३६ मतदारसंघात ४२० उमेदवार

मुंबईतील एकूण ३६ मतदारसंघापैकी १० मतदारसंघ शहर भागात असून २६ मतदारसंघ उपनगरात आहेत. ३६ मतदारसंघात एकूण ४२० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यापैकी शहर भागात १०५ उमेदवार, तर उपनगरात ३१५ उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. एकूण १० हजार ११७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

Story img Loader