नवी दिल्ली येथे सोमवारपासून सुरू झालेल्या जागतिक पुस्तक जत्रेच्या ‘इंग्रजी भाषा विभागा’त ‘केशव भिकाजी ढवळे’, ‘ज्योत्स्ना’ आणि ‘पॉप्युलर प्रकाशन’ हे तीन मराठी प्रकाशक सहभागी झाले आहेत. इंग्रजी भाषेत प्रकाशित केलेली आपली पुस्तके त्यांनी येथे मांडली आहेत. सार्थ ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, श्रीमद्भगवद्गीता, दासबोध आदी ग्रंथांचे आम्ही इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले असून त्यांची ई-बुक्सही आम्ही ‘आयमस्ती डॉट कॉम’च्या सहकार्याने प्रकाशित केली आहेत. आमच्या या धार्मिक ग्रंथाना अमेरिका आणि अन्य देशांतूनही खूप मोठी मागणी आहे. तसेच अन्य विषयांवरील काही पुस्तकेही आम्ही इंग्रजीत प्रकाशित केली आहेत. जागतिक पुस्तक जत्रेत देश-विदेशातील अन्य प्रकाशक, ग्रंथ विक्रेते सहभागी होत असतात. या निमित्ताने त्यांच्याशीही संपर्क होतो. धार्मिक-आध्यात्मिक ग्रंथांच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती परदेशात पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठीच आम्ही आमचे ग्रंथ इंग्रजी भाषेत प्रकशित करायला सुरुवात केली असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान पुस्तक जत्रेच्या भारतीय भाषा विभागात मराठी प्रकाशक परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या माध्यमातूनही काही मराठी प्रकाशक-ग्रंथविक्रेते सहभागी झाले आहेत. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर येत्या १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा