बँक खातेदारांना त्यांच्याकडे असलेले जुने धनादेश आणखी तीन महिने उपयोगात आणण्याची मुभा रिझव्र्ह बँकेने दिली आहे. धनादेश प्रणालीतील सामायिकता व सुरक्षिततेचा पैलू अधिक मजबूत करण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेली ‘सीटीएस-२०१०’ ही नवीन धनादेश प्रणाली १ जानेवारी २०१३ ऐवजी आता १ एप्रिल २०१३ पासून लागू होईल. सहकारी, ग्रामीण बँकांसह सर्वच बँकांना नव्या संक्रमणाशी जुळवून घेण्यासाठी धनादेश रचनेत बदल करण्यास कालावधी मिळावा, याकरीता हा बदल करण्यात आल्याचे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे. याबाबत रिझव्र्ह बँकेकडे आलेल्या असंख्य सूचनांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचेही बँकेने म्हटले आहे. खातेदारांनी जुने धनादेश संबंधित बँकेकडे जमा करून नव्या ‘सीटीएस-२०१०’ प्रणालीतील धनादेश स्वीकारावे, असे आवाहनही बँकेने केले आहे.
नव्या धनादेश प्रणालीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ
बँक खातेदारांना त्यांच्याकडे असलेले जुने धनादेश आणखी तीन महिने उपयोगात आणण्याची मुभा रिझव्र्ह बँकेने दिली आहे. धनादेश प्रणालीतील सामायिकता व सुरक्षिततेचा पैलू अधिक मजबूत करण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेली
First published on: 15-12-2012 at 03:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three month extension for new cheque system