मुंबई : सार्वजनिक वाहतुकीचे वाहन निष्काळजीपणे चालवल्याने प्रवाशांना तसेच रस्त्याचा वापर करणाऱ्यांनाही गंभीर धोका निर्माण होतो, असे निरीक्षण गिरगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नोंदवले. तसेच, जानेवारी २०२१ मध्ये पेडर रोड परिसरात सायकलस्वाराला जखमी केल्याच्या आरोपांत बेस्ट बसच्या चालकाला दोषी ठरवून तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

आपल्या २८ वर्षांच्या कारकिर्दीतील हा आपला पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळे, शिक्षेत दया दाखवण्याची याचना आरोपी चालकाकडून न्यायालयाकडे करण्यात आली. मात्र, अशा प्रकरणांमध्ये उदारता दाखवल्यास किंवा आरोपीला शिक्षेत दया दाखवल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे न्यायदंडाधिकारी नदीम पटेल यांनी स्पष्ट केले. तसेच, आरोपी चालकाची दयेची मागणी फेटाळून लावली.

Police seized 70 lakh rupess in suspicious car traveling from mp to Maharashtra
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात घबाड
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
250 kg of firecrackers seized in action against firecrackers sellers without license
रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई, २५० किलो फटाके जप्त
Vileparle DP road connecting SV Road and St Francis Road has not been built since 2015
ही तर न्यायव्यवस्थेची थट्टाच, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेवर ताशेरे, नऊ वर्ष निव्वळ आश्वासने, डीपी रस्ता मात्र कागदावरच
An amount of 4 crore 33 lakh crores was seized in Talasari police station limits
तलासरी पोलीस ठाणे हद्दीत ४ कोटी ३३ लाख कोटींची रक्कम जप्त
A young woman in Nagpur filed a molestation case against a policeman
‘युपीएससी’ची परीक्षा द्यायची आहे, विनयभंगाचा गुन्हा रद्द करा…

हेही वाचा – मुंबई: शिवसेनेच्या प्रचार साहित्यांनी सजले स्टॉल्स, प्रचार साहित्य घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

आरोपीला न्यायालयाने सार्वजनिक मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणारे कृत्य करणे, अशा कृत्याद्वारे दुखापत करणे या आरोपांत दोषी ठरवले. पोलिसांच्या आरोपांनुसार, जानेवारी २०२१ मध्ये आरोपीच्या वाहनाने तक्रारदाराच्या सायकलच्या हँडलला धडक दिली. परिणामी, तक्रारदार व्यक्ती खाली पडली आणि तिला साधी दुखापत झाली. आरोपीच्या २८ वर्षांच्या कारकिर्दीतील हा पहिलाच गुन्हा आहे आणि त्याचे कुटुंबीय पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे, त्याला शिक्षेत दया दाखवण्याची मागणी आरोपीच्या वकिलाने न्यायालयाकडे केली. तर, आरोपी सार्वजनिक वाहन चालवत होता आणि त्याने ते वाहन काळजीपूर्वक चालवणे गरजेचे होते, असा दावा करून आरोपीला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्याची मागणी पोलिसांच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली.

हेही वाचा – मुंबई : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवक विलास चावरी यांचा शिंदे गटात प्रवेश

शिक्षेबाबतचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, शिक्षेचे प्रमाण हे घटनेचे स्वरूप, तथ्य, पीडित व्यक्तीला झालेली दुखापत, गुन्ह्याचे स्वरूप आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यावर अवलंबून असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आपल्यासमोरील प्रकरणात, तक्रारदाराला झालेली दुखापत सामान्य आहे. तथापि, आरोपी हा सार्वजनिक वाहतुकीचा म्हणजेच बेस्टचा चालक आहे आणि त्याला निष्काळजीपणे बस चालवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले. हे प्रकरण बसमधील प्रवासी आणि रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. सार्वजनिक वाहतुकीचा चालक निष्काळजीपणे गाडी चालवत असेल तर ते धोकादायक आहे. त्याच्या या अशा वाहन चालवण्याने प्रवाशांना तसेच रस्त्याचा वापर करणाऱ्यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, अशा प्रकरणांमध्ये अवास्तव उदारता दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीची दयायाचना फेटाळताना नोंदवले.