खोटा अहवाल सादर करू नये यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडे सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या जी/उत्तर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली. यापैकी दोघांना रंगेहाथ तर एकाला दादर येथील कार्यालयातून अटक करण्यात आली.
मंगेश कदम, राकेश पाटील, स्वप्नील राणे अशी या कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. दादरला इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना हिवताप झाला आहे की नाही त्याची तपासणी करून त्याचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला सादर करण्याचे काम फिर्यादी करतात. त्या बदल्यात बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांना मोबदला देण्यात येतो. एप्रिल २०१२ मध्ये या तिघांनी एका बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यापैकी ५० टक्के रक्कम द्यावी वा खोटा अहवाल सादर केला जाईल, असे सांगून सात हजारांची मागणी केली होती.

Story img Loader