रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईसाठी तीन नव्या गाडय़ा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मुंबईहून नवी दिल्लीसाठी प्रिमियम वातानुकूलित एक्सप्रेस, बांद्रा टर्मिनस- जयपूर एक्सप्रेस आणि मुंबई- दिल्ली जनसाधारण एक्सप्रेस अशा तीन गाडय़ा मुंबईच्या वाटय़ाला आल्या आहेत. याशिवाय अहमदाबाद – चेन्नई ही गाडी वसई मार्गे जाणार आहे.
बुलेट ट्रेनसाठी ६० हजार कोटींचा खर्च
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची घोषणा मुंबई- अहमदाबाद या करण्यात आलेली आहे. सध्या मुंबईहून अहमदाबादसाठी आणि त्यापुढील स्थानकांसाठी मिळून दररोज २७ गाड्या धावतात. यातून सुमारे १२ ते १५ हजार लोक प्रवास करतात. यापैकी सगळ्यात जास्त, म्हणजे ताशी १२० किलोमीटर वेगाने धावणारी शताब्दी एक्सप्रेस ५०० किलोमीटरचे अंतर सुमारे आठ तासांत कापते. याशिवाय दूरांतो, डबल डेकर या गाडय़ाही बऱ्याच वेगवान आहेत. तथापि, प्रवाशांना हा प्रवास आणखी कमी वेळेत होण्याची गरज आहे. ताशी साडेतीनशे किलोमीटर वेगाने धावून हेच अंतर चार तासांहून कमी वेळेत गाठणारी बुलेट ट्रेन त्यांची इच्छापूर्ती करणारी ठरणार आहे.
प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेला रेल्वेमार्ग बांधण्यासह सिग्नलिंग व इतर यंत्रणा उभारण्यासाठी प्रत्येक किलोमीटरला १२५ कोटी, या हिशेबाने एकूण ६० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर असणार आहे. यातील काही मार्ग उंचावरून (एलेव्हेटेड), तर काही जमिनीवरून जाईल. बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावण्यास ६ ते ८ वर्षे लागतील, असा रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. बुलेट ट्रेनशिवाय मुंबई- अहमदाबाद मार्गावर ताशी १२० ते १६० किलोमीटर इतक्या वेगाने धावणाऱ्या ‘सेमी हायस्पीड’ गाडय़ा चालवण्याचीही रेल्वेची योजना आहे.

कोकणवासीयांना ‘अच्छे दिन’ दूरच
आरक्षणाच्या पहिल्या दिवशी अवघ्या काही मिनिटांतच प्रतीक्षायादीवरील तिकीटे मिळत असल्याने हैराण झालेल्या कोकणवासीयांना नव्या गाडय़ांच्या घोषणेची अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने कोकणवासीयांना ठेंगा दाखविला आहे. कोकण रेल्वेवर एकाही नव्या गाडीची घोषणा न केल्यामुळे चाकरमान्यांचा भ्रमनिरस झाला आहे.
रेल्वे अर्थसंकल्पामध्ये मुंबई-गोवा हायस्पिड रेल्वे गाडी सुरू करण्याची घोषणा केली. मात्र सध्या कोकण रेल्वेतून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. परंतु गाडय़ा कमी आणि प्रवासी जास्त अशी परिस्थिती असल्यामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी नाईलाजाने अन्य पर्याय निवडावा लागतो.

मुंबईकरहो, तुमच्यासाठी!
* उपनगरीय लोकल गाडय़ांसाठी स्वयंचलित दरवाजे बसवणार. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर काहीच गाडय़ांमध्ये चालवण्यात येणार आहे. या घोषणेद्वारे मुंबईतही स्वयंचलित दरवाजे असलेल्या काही गाडय़ा येत्या दोन वर्षांत धावतील.
* देशभरातील दहा स्थानकांचा आंतरराष्ट्रीय दर्जाने विकास करण्याच्या दृष्टीने निधीची तरतूद. या दहा स्थानकांमध्ये मुंबईतील किमान दोन स्थानकांचा समावेश असेल, अशी अपेक्षा.
* पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वाने महत्त्वाच्या स्थानकांवर पादचारी पूल, सरकते जिने, उद्वाहक बसवणार. यात मुंबईतील ठाणे, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, वांद्रे, बोरिवली, कल्याण, दादर, भायखळा, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, डोंबिवली अशा स्थानकांचा समावेश होऊ शकतो.
* सर्व महत्त्वाच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवरील छत, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा यांसाठी सेवाभावी संस्था, कॉर्पोरेट कार्यालये, खासगी कंपन्या यांच्यासह करार करणार. या सुविधांसाठी मुंबईतील काही स्थानकांचीही निवड होणार आहे.
* वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे बॅटरीवर चालणाऱ्या गाडय़ा तैनात करणार. या गाडय़ांमुळे अपंग, वृद्ध, महिला यांना आपापल्या डब्यांपर्यंत किंवा डब्यांपासून मुख्य प्लॅटफॉर्मपर्यंत येण्यास मदत होईल.
* कॉइन ऑपरेटेड एटीव्हीएम मशिन्सचा प्रसार आणि प्रचार करणार. मुंबई उपनगरीय मार्गावर त्याचा जास्त फायदा होणार आहे.
* महत्त्वाच्या ५० स्थानकांच्या स्वच्छतेसाठी रेल्वे खासगी कंपन्यांना कंत्राट देणार आहे. या स्थानकांवरील स्वच्छतेची तपासणी.

११ गाडय़ांचा विस्तार
रेल्वेने एकूण ५८ नवीन गाडय़ा सुरू करण्याचे ठरवले असून त्यात पाच जनसाधारण एक्सप्रेस, पाच प्रीमियम गाडय़ा, सहा एसी एक्स्प्रेस, २७ एक्स्प्रेस, आठ ँपॅसेंजर गाडय़ा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. संसदेत रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना आणखी सध्याच्या अकरा गाडय़ांचा विस्तार करण्याचे ठरवले आहे.खास गाडय़ा या सणासुदीच्या व सुटीच्या दिवसांत धावतील. त्यात मेलमारुवथूर, वेलनकण्णी व झालवाड या गाडय़ांचा समावेश आहे.

जनसाधारण गाडय़ा
* अहमदाबाद-दरभंगा जनसाधारण एक्स्प्रेस सुरतमार्गे
* जयनगर-मुंबई जनसाधारण एक्स्प्रेस
* मुंबई-गोरखपूर जनसाधारण एक्स्प्रेस
* सहरसा-आनंदविहार जनसाधारण एक्स्प्रेस मोतीहारीमार्गे
* सहरसा-अमृतसर-जनसाधारण एक्स्प्रेस

एसी एक्सप्रेस गाडय़ा
* विजयवाडा- नवी दिल्ली एक्स्प्रेस (रोज)
* लोकमान्य टिळक (टी)- लखनौ (साप्ताहिक)
* नागपूर-पुणे (साप्ताहिक)
* नागपूर-अमृतसर (साप्ताहिक)
* नहरलगून-नवी दिल्ली (साप्ताहिक)
* निजामुद्दीन-पुणे (साप्ताहिक)

प्रीमियम गाडय़ा
* मुंबई सेन्ट्रल-नवी दिल्ली प्रीमियम एसी एक्स्प्रेस
* शालिमार-चेन्नई प्रीमियम एसी एक्स्प्रेस
* सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन-प्रीमियम एसी एक्स्प्रेस
* जयपूर-मदुराई प्रीमियम एक्स्प्रेस
* कामाख्य-बंगळुरू प्रीमियम एक्स्प्रेस

एक्सप्रेस गाडय़ा
*  अहमदाबाद-पाटणा एक्स्प्रेस (साप्ताहिक) मार्गे वाराणसी
* अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेस (पंधरवडय़ाला) मार्गे वसई रोड
* बंगळुरू-मंगलोर एक्स्प्रेस (रोज)
* बंगळुरू-शिमोगा एक्स्प्रेस (आठवडय़ातून दोन-तीन वेळा)
* बांद्रा (टी)-जयपूर एक्स्प्रेस (साप्ताहिक) नागडा-कोटामार्गे
* बिदर-मुंबई एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* छप्रा-लखनौ एक्सप्रेस (आठवडय़ातून तीन वेळा) मार्गे बलिया, गाझीपूर, वाराणसी
* फिरोझपूर-चंडीगड एक्स्प्रेस (आठवडय़ातून ६ वेळा)
* गुवाहाटी-नहरलगून इंटरसिटी एक्स्प्रेस (रोज)
* गुवाहाटी-मुरकोंगसेलेक इंटरसिटी एक्स्प्रेस (रोज)
*गोरखपूर-आनंदविहार एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* हापा-विलासपूर एक्स्प्रेस (साप्ताहिक) नागपूरमार्गे
* हुजूर साहेब नांदेड-बिकानेर एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* इंदौर-जम्मू तावी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* कामाख्य-कटरा एक्स्प्रेस (साप्ताहिक) दरभंगामार्गे
* कानपूर-जम्मू-तावी एक्स्प्रेस (आठवडय़ातून दोनदा)
* लोकमान्य टिळक (टी)-आजमगढ एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* मुंबई-काजीपेट एक्स्प्रेस (साप्ताहिक) बल्हारशाहमार्गे
* मुंबई-पलिताना एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* नवी दिल्ली-भटिंडा शताब्दी एक्स्प्रेस (आठवडय़ातून दोन दिवस)
* नवी दिल्ली-वाराणसी एक्स्प्रेस (दैनिक)
* पारादीप-विशाखापट्टणम एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* पारादीप-हावडा एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* राजकोट-सेवा एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* रामनगर-आग्रा एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* टाटानगर- बय्यप्पनहल्ली (बंगळुरू) एक्स्प्रेस (साप्ताहिक)
* विशाखापट्टणम-चेन्नई एक्स्प्रेस (साप्ताहिक)

प्रवासी गाडय़ा
* बिकानेर-रेवाडी पॅसेंजर (दैनिक)
* धारवाड-दांडेली पॅसेंजर (दैनिक) अलनावरमार्गे
* गोरखपूर-नौतनवा पॅसेंजर (दैनिक)
* गुवाहाटी-मेंदीपठार पॅसेंजर (दैनिक)
* हटिया-राऊरकेला पॅसेंजर
* बिंदूर-कासरगौड पॅसेंजर (दैनिक)
* रंगापाडा उत्तर-रांगिया पॅसेंजर (दैनिक)
* यशवंतपूर-तुमकूर पॅसेंजर (दैनिक)

प्रस्तावित बुलेट ट्रेन
* दिल्ली-आग्रा
* दिल्ली-चंडिगढ
*  दिल्ली-कानपूर
*  नागपूर-विलासपूर
*  म्हैसूर-बंगळुरू-चेन्नई
* मुंबई-गोवा
* मुंबई-अहमदाबाद
* चेन्नई-हैदराबाद
*  नागपूर-सिकंदराबाद

मेमू सेवा
* बंगळुरू-रामानगरम सप्ताहात ६ दिवस (३ जोडय़ा)
* पलवल-दिल्ली-अलिगढ

डेमू सेवा
* बंगळुरू-नीलमंगला (दैनिक)
* छपरा- मंडुआडीह (आठवडय़ातून ६ दिवस) बलियामार्गे
* बारामुल्ला-बनिहाल (दैनिक)
*  संबलपूर-राऊरकेला (आठवडय़ातून  ६ दिवस)
* यशवंतपूर-होसूर (आठवडय़ातून  ६ दिवस)