मुंबई महानगरपालिकेचे विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये २६ डिसेंबरपासून अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी एकूण तीन रुग्णांवर अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पार पडली. या तिन्ही अँजिओप्लास्टी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत करण्यात आल्याने गरजू रुग्णांवर खर्चाचा कोणताही भार पडला नाही. कूपर रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया सुरू झाल्याने पश्चिम उपनगरांमधील रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा >>> मुंबई: शिवडीमध्ये ३०० किलो ओला कचऱ्यापासून गॅस निर्मिती; कचऱ्याच्या वाहतुकीवरील खर्चाची बचत होणार

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

कूपर रुग्णालयामध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये हृदयरोग विभाग सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिली अँजिओग्राफी करण्यात आली होती. तेव्हापासूनच अँजिओप्लास्टी सुरू करण्याचे रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आता अँजिओप्लास्टी सुरू करण्यात आली आहे. यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच, केईएम रुग्णालयाचे हृदयरोगविभाग प्रमुख डॉ. अजय महाजन यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.

हेही वाचा >>> मुंबई : सुशोभित केलेले पदपथ फेरीवाल्याना आंदण; अंधेरीत फेरीवाल्यांनी पदपथ व्यापले

कुपर रुग्णालयात साधारणतः आठ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ६० वर्षीय मधुमेहग्रस्त रुग्ण दाखल झाला होता. अँजिओग्राफी केल्यानंतर या रुग्णाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये दोन ठिकाणी अडथळे (ब्लॉकेज) आढळून आले. रुग्णाच्या हातातील रक्तवाहिनीमधून २ स्टेन्ट हृदयापर्यंत नेऊन अँजिओप्लास्टी करण्यात आली व हृदयाचा रक्तपुरवठा यशस्वीपणे पूर्ववत करण्यात आला. तसेच आणखी दोन रुग्णांवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे पश्चिम उपनगरात अँजिओप्लास्टी सुविधा देणारे कूपर रुग्णालय हे महानगरपालिकेचे पहिलेच रुग्णालय ठरले आहे.

Story img Loader