शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे यासाठी शिवसेनेने घेतलेल्या आग्रही भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर हंगामी आयुक्त राजीव जलोटा यांच्या अध्यतेखालील समितीने मंगळवारी सीआरझेडमधील अटी व शर्तीच्या आधीन राहून तीन स्मृती उद्यान प्रस्तावांवर शिक्कामोर्तब केले. आता हे प्रस्ताव बुधवारी राज्य शासनाला सादर करण्यात येणार असून शासनाच्या मंजुरीनंतर तात्काळ स्मृती उद्यानाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे पालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यसंस्कार झालेल्या जागेपासून जवळच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वीस गुणिले चाळीस फुटाचे मातीचे उद्यान बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात येणार नाही तसेच बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार नसल्याचे राजीव जलोटा यांनी सांगितले.
यापूर्वी पालिकेने तयार केलेला प्रस्ताव रद्द करावा लागला असून हेरिटेज समितीच्या शिफारशी व सीआरझेड-२मधील तरतुदींच्या अंतर्गत नियमांचा अभ्यास करून पालिकेने तीन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव उद्या पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. हे स्मृती उद्यान संपूर्ण मातीचे असल्यामुळे हेरिटेज समितीनेही त्याला हिरवा कंदिल दाखवला आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मारक कोणत्याही परिस्थितीत उभारणारच, असा इशारा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिला आहे.
हेरिटेज समितीच्या शिफारशी व सीआरझेड-२मधील तरतुदींच्या अंतर्गत नियमांचा अभ्यास करून पालिकेने तीन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव उद्या पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत.

Story img Loader