मुंबई : गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यात हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज्यामध्ये महिनाभरात हिवतापाचे दोन हजार ९२४ रुग्ण सापडले असून हिवतापाच्या रुग्णांची संख्या ७ हजार ४४७ वर पोहोचली आहे. तसेच हिवतापाच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे डेंग्यूचे २ हजार १६३ रुग्ण सापडले असून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ४ हजार ९६५ वर पोहोचली आहे. तसेच डेंग्यूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हिवताप व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये २१ जून ते १८ जुलै या एक महिन्याच्या कालावधीत हिवतापाचे २ हजार ९२४ रुग्ण सापडले आहेत. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक एक हजार ८२६ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल मुंबईमध्ये ६५७, चंद्रपूरमध्ये १०५ आणि पनवेलमध्ये ३७ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे जुलैमध्ये हिवतापामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून, हे तिन्ही मृत्यू गडचिरोलीमध्ये झाले आहेत.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Indians seeking asylum in USA
अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी गुजराती नागरिकांची चढाओढ; आसरा मागणाऱ्यांच्या संख्येत भारतातून तीन वर्षांत ८५५ टक्क्यांची वाढ
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
loksatta analysis blue zone concept fact or myth
या भागांतली माणसे असतात दीर्घायुषी… काय आहेत ‘ब्लू झोन’? ही संकल्पना वास्तव, की मिथक?
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?

हिवतापाप्रमाणे डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. २१ जून ते १८ जुलै या कालावधीत राज्यात डेंग्यूचे दोन हजार १६३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १८ जुलैपर्यंत तीन हजार १६४ वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये डेंग्युचे सर्वाधिक ३९४ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल कोल्हापूरमध्ये २९७, नाशिकमध्ये २३८, रायगडमध्ये १०३, रत्नागिरीमध्ये ६१ आणि पालघरमध्ये ४५ रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत राज्यात डेंग्यूने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा >>>‘आपला दवाखान्यां’त राज्यातील २७ लाख रुग्णांनी घेतले उपचार

चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ

हिवताप व डेंग्यूप्रमाणेच यावर्षी चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. २१ जून ते १८ जुलै या कालावधीत राज्यात चिकुनगुनियाचे ३३४ रुग्ण सापडले आहेत. राज्यात गतवर्षी याच कालावधीत चिकनगुनियाचे ३६३ रुग्ण सापडले होते. राज्यात यावर्षी आतापर्यंत चिकुनगुनियाचे १०७५ रुग्ण सापडले आहेत. गतवर्षी मात्र संपूर्ण वर्षभरात १७०२ रुग्ण सापडले होते.