मुंबई: इंडिया आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी २८० खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे एम. के. स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन, दिल्लीचे अरिवद केजरीवाल, पंजाबचे भगवंत मान हे विद्यमान मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेसच्या सोनिया गांधी, लालुप्रसाद यादव, तेजस्वी यादव, खासदार राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आदी महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नितीशकुमार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन यांची सुरक्षा यंत्रणा मुंबईत आली असून हयात हॉटेलमधील तपासणी केली आहे. राज्य सरकारने या सुरक्षेसाठी उपायुक्त दर्जाचा खास अधिकारी नेमला आहे. येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई तसेच शिष्टाचार संभाळण्यासाठी प्रत्येक नेत्याबरोबर एक कार्यकर्ता दिला आहे.
त्रिस्तरीय सुरक्षा, २८० खोल्या आरक्षित
या बैठकीच्या तयारीसाठी तीन पक्षांचे ३०० सक्रिय कार्यकर्ते नियोजनात आहेत. काँग्रेसकडे हॉटेलमधील तयारीची जबाबदारी आहे
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-08-2023 at 04:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three tier security circle for leaders attending india meeting in mumbai zws