मुंबई : दिग्गज आणि तरुण नाटककारांनी वेळोवेळी नाटकाच्या माध्यमातून स्त्रीच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. बदलत्या समाजरचनेबरोबर स्त्रीचे बदललेले स्थान, तिने घेतलेल्या भूमिका, नातेसंबंध असोत वा शिक्षण-नोकरीतील आव्हाने स्वीकारत झालेली तिची वाटचाल या सगळ्याचे प्रतिबिंब नाटकातून प्रभावीपणे उमटले. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर नाटकातील नायिकांच्या रुपाने उलगडत गेलेल्या स्त्रीत्वाच्या पैलूंचे वेध घेणारा ‘ती’ची भूमिका हा खास कार्यक्रम ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

रंगभूमीवरील महत्वपूर्ण स्त्री व्यक्तिरेखांमधून स्त्रीचे माणूस म्हणून अवलोकन करणारा ‘ती’ची भूमिका हा आगळावेगळा कार्यक्रम मंगळवारी, ७ मे रोजी मुलूंड येथील कालिदास नाट्यगृहात रंगणार आहे. वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या नाटककारांच्या पाच प्रातिनिधिक नाट्यप्रवेशांमधून बदलत गेलेली ‘ती’ची भूमिका रंगमंचावर सादर होणार आहे. प्रस्थापित, दिग्गज पुरुष नाटककार पु. ल. देशपांडे आणि विजय तेंडुलकर यांनी मांडलेली स्त्री भूमिका ते तरुण स्त्री नाटककार अभिनेत्री रसिका जोशी, श्वेता पेंडसे यांच्या विचारातून उतरलेली स्त्री असा प्रवास या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत कालिदास नाट्यगृहात उपलब्ध आहेत.

sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Daily Horoscope 12th November 2024 in Marathi
१२ नोव्हेंबर पंचांग: देवउठनी एकादशीला १२ पैकी ‘या’…
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
shiv thakare and big boss 16 contenstant dancing video
Video : ‘लडकी आंख मारे’वर शिव ठाकरे थिरकला, त्याच्यासह Bigg Boss १६ च्या स्पर्धकांनीही केला डान्स; चाहते म्हणाले, “चुगली करणारे…”
Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…
love lagna locha new marathi movie
‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकातील शालीन नायिका, विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’मधून भेटणारी बंडखोर नायिका, ‘सांगते ऐका’ म्हणत समाजाला आपली दखल घ्यायला लावणारी कणखर अभिनेत्री ते तुलनेने अगदी अलिकडच्या काळातील ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ आणि ‘३८ कृष्ण व्हिला’ या तरुण अभिनेत्री, लेखिकांच्या कल्पनेतून उतरलेल्या नायिकांचे विचार हा प्रवास ‘ती’ची भूमिका या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

‘ती’ची भूमिका या कार्यक्रमामागचा विचार ते काळाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत गेलेल्या नाटकांच्या नायिका, नाटककारांनी मांडलेला विचार असा सर्वसमावेशक आढावा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या ओघवत्या सूत्रसंचालनातून रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. या कार्यक्रमाचे संहिता लेखन हर्षदा बोरकर यांनी केले असून संयोजन उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्स या संस्थेने केले आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे, ध्वनी योजना राज साऊंड यांची तर नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचे आहे.

सादरीकरण

अदिती देशपांडे, मानसी जोशी, भार्गवी चिरमुले, अदिती सारंगधर, सोनाली कुलकर्णी, मिलिंद फाटक, डॉ. श्वेता पेंडसे, डॉ. गिरीश ओक, मानसी कुलकर्णी.

संकल्पना

या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे लिखित ‘सुंदर मी होणार’, विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’, रसिका जोशी – मिलिंद फाटक लिखित ‘व्हाईट लिली नाईट राडयर’, डॉ. श्वेता पेंडसे लिखित ‘३८ कृष्ण व्हिला’ आणि विश्वास सोहनी यांनी नाट्यरुपांतर केलेल्या ‘सांगते ऐका’ अशा पाच नाटकांमधील प्रवेश सादर केले जाणार आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. एका व्यक्तीसाठी एक प्रवेशिका उपलब्ध होईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात येतील.

मुख्य प्रायोजक

वामन हरी पेठे ज्वेलर्स

सहप्रायोजक

वीणा वर्ल्ड

उज्ज्वला हावरे लेगसी

पॉवर्ड बाय

जमीनवाले प्रा. लिमिटेड

कधी

७ मे, सायंकाळी ६.१५ वाजता.

कुठे

कालिदास नाट्यगृह, मुलुंड (पश्चिम)