लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत प्राप्त करत अभूतपूर्व यश संपादन केले. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवार, ५ डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतील मुंबई महानगरपालिका मार्गावरील आझाद मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरासह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुमारे ५ हजार पोलीस आझाद मैदान परिसरात तैनात राहणार असून त्यामध्ये जवळपास चार ते साडेचार हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. तसेच, २ दंगल नियंत्रण पथक, तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकेही असणार आहेत.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Rabi sowing in the country is on 428 lakh hectares
देशातील रब्बी पेरण्या ४२८ लाख हेक्टरवर; जाणून घ्या, देशभरातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र
Bogus applications in fruit crop insurance scheme
फळपीक विमा योजनेतही बोगस अर्जांचा सुळसुळाट; जाणून घ्या, सर्वांधिक बोगस अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आले
Opportunities in the field of radiation research at Mumbai University
मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रात संधी!
Mumbaikars await cold weather
मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा
Construction of elevated deck at Khar Road of Western Railway
पश्चिम रेल्वेच्या खार रोड येथे ‘एलिव्हेटेड डेक’ची उभारणी

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात एकूण तीन व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर दोन व्यासपीठांवर लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर असतील. महायुती सरकारच्या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सर्व मान्यवरांच्या (व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी) आगमन मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या मार्गांवर पोलीस अधिकारी, गृहरक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात असतील. तसेच या मार्गांवर वाहतूक पोलिसही असणार आहेत. त्यामध्ये सुमारे १४४ वाहतूक पोलीस अधिकारी आणि १ हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. तसेच, मुंबईतील मुख्य रस्त्यांवर साध्या वेशातील पोलीस अधिकारीही तैनात असतील, अशी माहिती सूत्रांनी व अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-पश्चिम रेल्वेच्या खार रोड येथे ‘एलिव्हेटेड डेक’ची उभारणी

आझाद मैदान परिसरात पोलीस अधिकाऱ्यांची मोठी फौज

शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान परिसरात पोलीस अधिकाऱ्यांची मोठी फौज असणार आहे. याठिकाणी एक सह पोलीस आयुक्त, तीन अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, १६ सहाय्यक पोलीस उपायुक्त आणि सुमारे ६०० पोलीस अधिकारी तैनात असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी व अधिकाऱ्यांनी दिली.

शपथविधीसाठी मुंबई महानगरपालिकाही सज्ज

आझाद मैदानावर गुरुवारी होणाऱ्या शपथविधीसाठी मुंबई महापालिका प्रशासनानेही तयारी केली आहे. आझाद मैदान राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे पालिकेने या शपथविधीसाठी सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची डागडुजी, वाहतूक चिन्हे व रेषा यांची रंगरंगोटी, दुभाजकांची रंगरंगोटी, पाणीपुरवठा, शौचालये आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच मैदान परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्याच्या छाटणीचे काम होती घेण्यात आले आहे. मैदानातील कचरा आणि राडारोडा हटवणे, अतिक्रमण निर्मूलन इत्यादी कामाना वेग आला असल्याची माहिती पालिकेच्या ए विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार या भागात सोयी – सुविधा देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.