लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलीसांतर्फे शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

शहरातील सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, शॉपिंग मॉल आदी महत्वाच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, क्युआरटी टीम, बीडीडीएस टिम, आरसीपी प्लाटून, होमगार्डस् तैनात असतील. ३१ डिसेंबरपासून १ जानेवारी रोजी पहाटेपर्यंत मुंबई पोलीस दल आणि वाहतूक विभागासह ८ अपर पोलीस आयुक्त, २९ पोलीस उप आयुक्त, ५३ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २ हजार १८४ पोलीस अधिकारी आणि तब्बल १२ हजार ४८ पोलीस अंमलदार असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आणखी वाचा-महापालिका निवडणुकांना आघाडी म्हणून सामोरे जावे, काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव

दरम्यान, बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे करण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्यात येणार आहे. वाहतुकीशी संबंधित विविध नियमांचे उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालवणे या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मद्य पिऊन वाहन चालवणारे, अंमलीपदार्थ विकी तसेच सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणारे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे आणि महिलांशी गैरवर्तवणूक करणाऱया व्यक्ती, अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून नववर्षाचे स्वागत उत्साहात व जल्लोषात करावे आणि तात्काळ पोलीस मदतीसाठी १०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.