मुंबई : सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नव्या वर्षांचे स्वागत करताना जुने सारे मागे सारून नव्याकडे झेप घेण्याच्या मानवी स्वभावाचे दर्शन घडवणारे उत्साही वातावरण सर्वत्र आहे. नववर्षांचे जल्लोषात स्वागत करताना उत्साहाला गालबोट लागू नये, नागरिकांची आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस, रेल्वे आणि बस सेवेसह सर्व यंत्रणा सज्ज आहेत. पोलिसांनी मुंबई आणि ठाण्यात ऑल आऊट ऑपरेशन राबवून समाजकंटकांवर कठोर कारवाई केली आहे.

नववर्षांच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात गुरूवारी रात्री ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले. त्यात फरार २९ आरोपींना अटक करण्यात आली, तर २५२ ठिकाणी शोध मोहीम राबविली. त्याचबरोबर आठ हजार ६९० वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत दोन हजार ३०० वाहनचालकांविरुद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. ६० मद्यपी चालकांवर बडगा उगारण्यात आला.  नववर्षांनिमित्त शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी रेल्वे परिसरात जनजागृती करण्यासाठी पथनाटय़ांचे प्रयोग करणार आहेत. पोलीस रात्रकालीन बंदोबस्तात एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.

Pimpri , Disaster Management, Japanese Technology ,
पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करून सव्वा कोटी थकवले
Dombivli illegal hoardings loksatta news
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
pm Narendra modi loksatta news
PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
81 Bangladeshi nationals arrested from Mumbai news
मुंबईतून ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक; नववर्षातील पहिल्याच १० दिवसांतील पोलिसांची कारवाई
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…

नववर्ष स्वागत जल्लोषात पण सात्विक स्वरुपात देखील नववर्ष स्वागत करता येते, असा संदेश पसरवण्यासाठी काही स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वे पोलीस आणि स्वयंसेवी संघटनांच्या वतीने रेल्वे प्रवाशांना दुधाचे वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा, असे आवाहन नशाबंदी मंडळाने केले आहे.

दरम्यान, नववर्षांच्या पूर्व संध्येला गेटवे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही काळ जेट्टींवर बोटी उभ्या करण्यास बंदी घालावी, अशी मागणी पोलिसांनी गेट वे ऑफ इंडियांच्या व्यवस्थापनाकडे केली आहे.

हेही वाचा – घर घेऊ इच्छिणाऱ्यांना म्हाडाकडून नववर्षांची भेट

जोडसुट्टय़ांची मेजवानी

नव्या वर्षांत नोकरदारांची जोडसुट्टय़ांची चंगळ आहे. प्रत्येक महिन्यात किमान एक सार्वजनिक सुट्टी, रविवारला जोडून येणाऱ्या सणांमुळे मिळणाऱ्या जोडसुट्टय़ा आणि मार्च-एप्रिल महिन्यांत एकूण १६ सार्वजनिक सुट्टय़ा मिळणार आहेत. रविवारच्या सुट्टीने श्रीगणेशा होत असलेल्या नवीन वर्षांत नोकरदार वर्गासाठी सुट्टय़ांची चंगळ असेल. त्यामुळे २०२३ची दिनदर्शिका हातात पडताच अनेकांनी या जोडसुट्टय़ांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

२०३४ मध्ये २०२३ची पुनरावृत्ती

दर काही वर्षांनी दिनदर्शिकेची पुनरावृत्ती होते. त्यानुसार २०३४ मध्ये २०२३ च्या दिनदर्शिकेची (तारीख-वार समान) पुनरावृत्ती होणार असल्याची माहिती गणित अभ्यासक दीनानाथ गोरे यांनी दिली.

हेही वाचा – New Year 2023 : नवीन वर्षानिमित्त Special Gift द्यायचंय? मग ‘या’ ९ ‘Gadgets’चा करू शकता विचार

२०२३ मध्ये चार ग्रहणे, ११ उल्का वर्षांव

मुंबई : नव्या वर्षांत दोन वेळा सूर्यग्रहण, दोन वेळा चंद्रग्रहण, सुपरमून, मायक्रोमून, ब्लू मून, ११ उल्का वर्षांव, ग्रहांची युती-प्रतियुती, अयन आणि विषुवदिन, धुमकेतू, पृथ्वी जवळून जाणारे धोकादायक उल्का आणि इस्रोच्या आगामी वर्षांतील अवकाशीय मोहिमा आदी खगोलीय घटना पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. यंदा दोन वेळा सूर्यग्रहण आणि दोन वेळा चंद्रग्रहण होणार आहे. नव्या वर्षांत भारतातून ५ आणि ६ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण आणि २८-२९ ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. तर, २० एप्रिल रोजी खंडग्रास सूर्यग्रहण, १४ ऑक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

२०२३ मध्ये काही सार्वजनिक सुट्टय़ा रविवारी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती, लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी रविवारी येत आहे. त्यामुळे या सार्वजनिक सुट्टय़ा रविवारच्या साप्ताहिक सुट्टीत जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच १४ नोव्हेंबरला बालदिनीच (पं. जवाहरलाल नेहरू जयंती) दिवाळी पाडव्याचीही सुट्टी आहे.

Story img Loader