आपण हिंदू आहोत, हे सार्वजनिकरित्या म्हणण्याची आपल्याला भीती वाटते, असे वक्तव्य करणारे अभिनेते अनुपम खेर व त्यावरून त्यांच्यावर टीका करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यात ट्विटरवर चांगलीच शाब्दिक लढाई जुंपली. खेर ‘संघी हिंदू’ असल्याची टीका थरूर यांनी केली. तर, खेर यांनी थरूर यांना काँग्रेसचा चमचा म्हणून हिणवले.
कादर खान यांचीही टीका..
अभिनेते कादर खान यांनीही खेर यांच्यावर शरसंधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्यापलीकडे त्यांनी काय केले, असा प्रश्न विचारला होता.

Story img Loader