मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) राबविण्यात येणाऱ्या पदवीस्तरावरील विविध अभ्यासक्रमांसाठी https://idoloa.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांसाठी https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावरून मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रम, प्रथम व द्वितीय वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रथम वर्ष एमसीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी शेवटची संधी असणार आहे.
तसेच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची तपशीलवार माहिती विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण प्रणाली हा एक योग्य व सोयीस्कर पर्याय आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी आज प्रवेश अर्ज भरावा’, असे आवाहन ‘आयडॉल’चे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.
© The Indian Express (P) Ltd