आजचा कार्यक्रम
- सकाळी ०७ : ०० – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानापासून निघेल आणि दादरला शिवाजी पार्कवर पोहचेल.
- सकाळी १० : ०० – शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेब ठाकरेंचे पार्थिव सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार.
- सायंकाळी ०६ : ०० – शिवतीर्थावर अंत्यसंस्कार करण्यात येणार.
शिवाजी पार्कवरील व्यवस्था
- मीनाताई ठाकरे पुतळा आणि समर्थ व्यायाम मंदिर प्रवेशद्वारातून सर्वसामान्यांना प्रवेश.
- समर्थ व्यायाम मंदिर प्रवेशद्वारानं महिलांसाठी वेगळी रांग.
- उद्यान गणेश येथील प्रवेशद्वारानं ठाकरे कुटुंबिय, राजकीय नेते आणि व्हीआयपींना प्रवेश.
- खासगी बस आणि मोठ्या वाहनांनी येणा-या शिवसैनिकांना सेनापती बापट मार्गावर पार्कींगची सूचना.
- पार्कींगला बंदी : वीर सावरकर रोड, रानडे रोड, एन.सी.केळकर रोड, कुळसेकर मार्ग, एल.जे.रोड, गोखले रोड, कटारिया मार्ग, सयानी मार्ग
वाहतुकीमध्ये बदल : काय बंद.. काय चालू..
- मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तीनही रेल्वे लाईनवरचा मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आला आहे.
- ‘बेस्ट’तर्फे संपूर्ण मुंबई शहरातून शिवाजी पार्कच्या दिशेने जादा गाड्या सोडण्यात येणार.
- मुंबईत आज (रविवार) टॅक्सीसेवा बंद. टॅक्सी युनियनचा निर्णय.
- आज (रविवार) कामाशिवाय दादर, वांद्रे भागात जाणं तसंच वेस्टर्न एक्स्प्रेस वे चा वापर करणं टाळा – मुंबई पोलिसांचा सल्ला.
- आज (रविवार) महत्वाचं काम असेल तरचं बाहेर पडा – मुंबईच्या पोलिस आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन.
- पेट्रोलपंप बंद ठेवू नका शिवसेनेचे आवाहन. मुंबईसह राज्यात सर्व पेट्रोलपंप सुरू राहणार.
- मुंबईतील सर्व नाट्यगृह, सिनेमा गृह आणि मल्टिप्लेक्स दोन दिवस बंद राहणार.
- आज (रविवार) राष्ट्रीय प्रज्ञा शोध आणि चार्टर्ड अकांऊट, माहिती आणि प्रसारण विभागाच्या परिक्षांसह राज्यभरात होणा-या सर्व परीक्षा रद्द.
- संपूर्ण मराठवाड्यात उत्स्फूर्त बंदचे शिवसेनेच्या वतीने आवाहन.
- मुंबईत १८ आणि १९ तारखेला होणा-या मॅचेस रद्द करण्यात आल्या आहेत.