मंगल हनवते

मुंबई : भविष्यात २०२७ नंतर मुंबईत येणाऱ्या वाहनांकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या  (एमएमआरडीए) माध्यमातून टोलवसुली (पथकर वसुली) केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या प्रदेशद्वारावरील पाच टोलनाक्यांवरील (पथकर नाके) पथकर वसुलीचे सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) असलेले अधिकार २०२७ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर हे अधिकार आपल्याला द्यावेत, अशी मागणी एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे. या मागणीसंबंधीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
India aims to be FMD free by 2030
पाच वर्षांत देश ‘एफएमडी’ मुक्त करण्याचा संंकल्प, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांची माहिती
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश

एमएमआरडीए मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मेट्रो, सागरी सेतू, भूमिगत मार्ग, उन्नत मार्ग, उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प राबवीत आहे. सध्या एक लाख १९ हजार ७६४ कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. प्रकल्पांसाठी लागणारा निधी कर्ज रूपाने उभा केला जात आहे. तसेच बीकेसीतील भूखंड विक्री हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत असून तो पुरेसा नाही. सध्या एमएमआरडीएची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने मुंबईत येणाऱ्या वाहनांकडून पथकर वसूल करण्याचे अधिकार आपल्याला द्यावेत, अशी मागणी केली. यासंबंधीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पथकर वसुलीचा अधिकार मिळण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

एमएसआरडीसीने १९९५-९८ दरम्यान मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी ५५ उड्डाणपूल बांधले. या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आलेला खर्च वसूल करण्यासाठी एमएसआरडीसीने मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून पथकर वसूल करण्याचे अधिकार मिळविले. ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत पथकर वसुलीचे अधिकार एमएसआरडीसीकडे असून त्यानंतर पथकर वसुली बंद होणार आहे. त्यामुळे २०२७ नंतर पथकर वसुलीचे अधिकार एमएमआरडीएला हवे आहेत. उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करणे हा या मागचा उद्देश आहे.

एमएमआरडीए २००५ पासून मुंबईत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक प्रकल्प राबवीत आहे. मागील काही वर्षांत एमएसआरडीसीने मुंबईत वाहतुकीबाबतचे मोठे प्रकल्प राबविलेले नाहीत, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. याविषयी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

नागरिकांची पथकरातून सुटका नाहीच

दहिसर, मुलुंड, एलबीएस मार्ग, ऐरोली आणि वाशी असे पाच पथकर नाके असून या नाक्यांवरील पथकर वसुलीचा कालावधी २०२७ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या वाहनांची पथकरातून लवकरच सुटका होणार असे वाटत असतानाच आता २०२७ नंतर एमएमआरडीएकडून पथकर वसुली केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्यांची पथकरातून पुढील काही वर्षे सुटका होण्याची शक्यता नाही.

Story img Loader