मुंबई : रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नाही.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉककाळात ठाणे- वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गिका, बेलापूर/ नेरुळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यानची रेल्वे मार्गिका सुरू राहणार आहे.
मध्य रेल्वे- मुख्य मार्ग
’ कुठे : माटुंगा- ठाणे अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
’ कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
’ परिणाम : ब्लॉककाळात सीएसएमटी- कल्याण अप आणि डाऊन धिम्या लोकल माटुंगा- ठाण्यादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबतील. त्याचबरोबर नियोजित स्थानकांमध्ये थांबा घेतील.
हेही वाचा >>>अँटेलिया प्रकरणातला आरोपी सचिन वाझे दत्तक घेणार मांजरीचं पिल्लू, न्यायालयात केला अर्ज
हार्बर मार्ग
’ कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर
’ कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
’ परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- पनवेल/ बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद असेल. सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल- ठाणे अप लोकल सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे- पनवेल डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहे.
पश्चिम रेल्वे
’ कुठे : बोरिवली- भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर
’ कधी : शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत असा एकूण चार तासांचा ब्लॉक
’ परिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल विरार/ वसई रोड- बोरिवली स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर धावतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नाही.