जयश्री टूर्स कंपनीने चारधाम यात्रेसाठी पुण्यातील ज्येष्ठ नागरिक पर्यटकांकडून प्रत्येकी ३६ हजार रुपये घेतले होते. मात्र, कंपनीने केलेल्या गैरसोयी पाहता दिल्लीत अडकलेल्या पर्यटकांनी कंपनीकडे पैशांच्या परतफेडीची मागणी केली आहे.
मात्र, याबाबत कंपनीकडून कोणतेही ठोस आश्वासन दिले जात नसल्याने पर्यटकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. केदारनाथला पायऱ्या चढाव्या लागू नयेत म्हणून प्रवास खर्चाव्यतिरिक्त हेलिकॉप्टरच्या नोंदणीसाठी कंपनीने पर्यटकांकडून दहा हजार रुपयेही आगाऊ घेतले होते. मात्र, येथे चौकशी केली असता हेलिकॉप्टरची कोणतीही नोंद झालेली नसल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले. या फसवणुकीविरोधात ग्राहक न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे भारत येरमाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
नामसाधम्र्यामुळे त्रास
दरम्यान, ‘जयश्री टूर्स’ ही ‘जयश्री ट्रॅव्हल’मधून फुटून निघालेली आपल्या भावाची कंपनी आह़े  त्यांच्याकडून असे उद्योग केले जातात आणि नामसाधम्र्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागतो़  या कंपनीशी आमचा काहीही संबंध नाही, असे ‘जयश्री ट्रॅव्हल’चे प्रमुख राजेश देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी संपर्क करून सांगितल़े

बातमी छापाच मग बघा काय करतो ते..
तुम्ही बातमी छापाच म्हणजे मी या मंडळींच्या येण्याची व्यवस्थाच करणार नाही़  त्यांना स्व-खर्चानेच यायला सांगेन आणि न्यायालयात जाऊन दाद मागायला सांगेऩ  विमानाचे बुकिंग २८ जूनचे होत़े  ते आधी करण्याचा खर्च मी का उचलायचा़  तरीही त्यांना गुरुवारी संध्याकाळच्या विमानाची तिकीट नोंदणी केली आह़े  हेलिकॉप्टरचे भाडेवगळता कोणत्याही पैशांची परतफेड मी करणार नाही़  त्यांनी १५ हजार रुपये अधिक दिले तर सप्टेंबरमध्ये रेल्वेने ही टूर करून आणेऩ  मी प्रवाशांची कोणतीही गैरसोय केलेली नाही़  सोमवार दुपारनंतर तिथल्या बातम्या आल्या, तोपर्यंत पर्यटक तेथे पोहोचले होत़े
    – नीलेश देशपांडे, जयश्री टूर्सचे प्रमुख़

Story img Loader