पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडल्याने रविवारही द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीतच आहे. जोपर्यंत तज्ज्ञ घटनास्थळी येऊन पाहून हिरवा कंदिल देत नाहीत तोपर्यंत खंडाळा बोगदा परिसरातली वाहतूक विस्कळीत असणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
आज सकाळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी परदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने जिओलॉजिकल सर्वे करण्यात आल्याचे सांगितले. धोकादायक दरडी पाडण्याचे काम सुरू असल्यामुळे दरडींचा धोका कायम असल्याने प्रवाशांना आपला जीव धोक्‍यात घालूनच प्रवास करावा लागत आहे.
सध्या लहान वाहनांची वाहतूक लोणावळा ते अमृतांजन पूल दस्तरी भागात जुन्या राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली आहे. एक रस्ता पुण्याकडे येणा-या वाहनांसाठी आणि दुसरा रस्ता मुंबईकडे जाणा-या अवजड वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic at mumbai pune express highway