लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवार, २३ जानेवारी रोजी दुपारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या द्रुतगती महामार्गावर दुपारी १२ ते २ दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?
block on Konkan Railway, Madgaon, Impact on two trains,
कोकण रेल्वेवर दोन दिवसीय ब्लॉक, मडगावसह दोन रेल्वेगाड्यांवर परिणाम
Lakshmi Road closed to traffic on the occasion of Pedestrian Day Pune news
पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक कि.मी २४.२५० आणि पुणे वाहिनीवर साखळी क्रमांक कि.मी ५६.९०० (कुसगाव वाडी ) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेणार आहे. या कामादरम्यान वरील भाग वाहतुकीसाठी बंद असणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन कि.मी ५५.००० वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून मार्गस्थ होतील. पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने आणि बसेस खोपोली एक्झिट कि.मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.

आणखी वाचा-मराठा सर्वेक्षणाचा प्रशासकीय कामांना फटका? 

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड -अवजड वाहने खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट कि.मी ३२.५०० येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील. तर मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ होतील. मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किलोमीटर ५४.९०० येथील कुसगाव टोल नाका येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून पुण्याकडे वळविण्यात येईल.

Story img Loader