लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) मंगळवारी (३० जानेवारी) करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-‘एअर इंडिया’ वसाहतीतील कर्माचाऱ्यांना तात्पुरता दिलासा; पाडकाम तूर्त नाही; विमानतळ प्राधिकरणाची न्यायालयात हमी

मुंबई ते पुणे वाहिनीवर (पुणेकडे जाणारी वाहिनीवर) साखळी क्रमांक कि.मी ६३.००० आणि साखळी क्रमांक कि.मी ७५.२५० येथे दुपारी १२.०० ते २.०० वाजेदरम्यान हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गॅन्ट्री बसविताना या कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. तर मुंबई ते पुण्याकडे जाणारी वाहने साखळी क्रमांक कि.मी ५४.४०० येथून कुसगाव टोलनाका येथून सर्व प्रकारची वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (जुना मुंबई-पुणे मार्ग) मार्गाने पुणेबाजूकडे वळविण्यात येतील.

Story img Loader