महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ ( मुंबई दिशेने ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२ ते २ या वेळेत पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक किवळे ते सोमाटणे फाटादरम्यान बंद राहील, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुंबई : स्वस्त गाड्या, भंगाराच्या कंत्राटाचे आमिष दाखवून पोलीस शिपायाची फसवणूक ; ४८ लाख रुपयांना गंडा घालणारा मुख्य आरोपी अटकेत

किवळे ते सोमटणे फाटादरम्यान दोन तास वाहतूक बंद राहणार असल्याने वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून तसेच सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी ट्राफिक ब्लॉक दरम्यान द्रुतगती पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या ९८२२४९८२२४ या दुरध्वनी क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही एमएसआरडीसीने केले आहे.