रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या वाहतुक पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार जुहू-वर्सोव लिंक रोड येथे घडला. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अजय कोर्लेकर(५६) हे डीएन नगर वाहतुक विभागात कार्यरत आहेत.

हेही वाचा >>> मुंबई: पालिका अधिकाऱ्याला शिवसेनेच्या शाखा प्रमुखाकडून मारहाण

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
The incident took place in Mumbai and an FIR to the tune was lodged on Tuesday, the Oshiwara police said on Thursday. (Representative Image)
Mumbai Crime : जुनं फर्निचर विकायला गेली मुंबईकर महिला, साडेसहा लाखांचा ऑनलाईन गंडा! नेमकं काय घडलं?
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक
Mercedes Benz Accident
Mercedes Benz Accident : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज गाडी चालवत तरुणाने एका महिलेला चिरडले, आरोपी अटकेत
two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी

मुंबई पोलिसांच्या नियत्रंण कक्षाकडे जुहू-वर्सोवा रस्त्यावर वाहने उभी करण्यात आल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यावेळी कोर्लेकर व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. त्यांनी तेथील उभ्या गाड्यांचे छायाचित्र काढण्यास सुरूवात केली असता तीन व्यक्ती तेथे आल्या व त्यांनी कोर्लेकर यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यातील एकाने कोर्लेकर यांच्या कानाखाली मारले. त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याच्यासह असलेल्या दोन व्यक्तींनी कोर्लेकर यांचे हात पकडले व आरोपी पळून गेला. त्यानंतर आरोपीचे साथीदारही पळून गेले. या घटनेनंतर कोर्लेकर यांनी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार वर्सोवा पोलिसांनी शनिवारी तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.