मुंबई : लोखंडी प्लेट घेऊन जाणाऱ्या एका ट्रेलरचा चेंबूर नाका परिसरात अपघात झाल्यामुळे शीव-पनवेल मार्गावर चेंबूर येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. हा ट्रेलर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास रस्त्यावरून हटविल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
नवी मुंबई येथून एक ट्रेलर बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास लोखंडी प्लेट घेऊन शीवच्या दिशेने जात होता. चेंबूर नाका परिसरात अचानक एक प्लेट तुटून ट्रेलरच्या केबिनवर आदळली. त्यामुळे ट्रेलर रस्त्यातच बंद पडला. परिणामी, शीवच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ट्रेलर रस्त्यावरून हटविला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.