राज्यातील दुष्काळामुळे घोंघावत असलेले पाणीसंकट आणि मुंबई पोलिसांनी केलेली जनजागृती यामुळे यंदाचे धुलिवंदन मुंबईत शांततेत साजरे झाले. दारु पिऊन वाहन चालविण्याच्या घटनांमध्येही किंचित घट झाल्याचे दिसून आले. गुरुवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या ६८७ जणांवर कारवाई करण्यात आली. मागील वर्षी ही संख्या ७४९ इतकी होती. इतरही गुन्ह्य़ांमध्ये काहीशी घट झाल्याचे यावर्षी दिसून आले.
होळी पेटल्यानंतर राज्यभरात धुलिवंदनाच्या जल्लोषाला सुरुवात होते. बुधवारी रात्रीपासूनच धुलिवंदनाला सुरुवात झाली होती. रंगाचा सण साजरा करताना मद्यपान करुन गाडी चालविण्याबरोबरच भरधाव गाडय़ा चालवणे, विनाहेल्मेट मोटारसायकल चालविण्याच्या घटना दरवर्षी घडतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसह १ हजार २९१ वाहतूक पोलीस बंदोबस्तावर होते.
ठिकठिकाणी नाकाबंदी लावून नियम तोडणाऱ्या तसेच बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा