मुंबईः डिजिलॉकर व एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. वाहनचालकांनी वाहनाची डिजिटल कागदपत्रे दाखवूनही चालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी गुरूवारी याबाबतचे लेखी आदेश जारी केले. त्यामुळे आता मुंबईकर मोटरगाडी व दुचाकीच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिलॉकर अॅपच्या मदतीने वाहतूक पोलिसांना कागदपत्रे दाखवू शकतात. केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी वाहनचालक परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र, तसेच इतर कागदपत्रांची डिजिटल कॉपी डिजिटल लॉकर व एम परिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा