मुंबईः करोनाविषयक कडक निर्बंध हटविल्यानंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियमनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांसह सुमारे १० हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहेत. विसर्जनस्थळांवर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून पोलिसांबरोबरच निरनिराळ्या यंत्रणा, संस्था भाविकांच्या मदतीसाठी सज्ज राहणार आहेत. त्यात प्रशिक्षणार्थी पोलीस, होमगार्डचे जवान, नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे जवान, एनएसएसचे विद्यार्थी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांचा समावेश आहे.
गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई आदी महत्त्वाच्या विसर्जनस्थळी मुंबई शहर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कक्ष उभारण्स्थायात आले आहे. गणेश विसर्जनादरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी निरीक्षण मनोरे उभे करण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान वाहने बंद पडून अथवा विसर्जनाच्या मार्गात अडथळा दूर करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस विभाग, मुंबई महानगरपालिकेने लहान – मोठ्या क्रेनची व्यवस्था केली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी १० वाजता गणेश विसर्जनाला सुरुवात होते. त्यामुळे गणएश विसर्जन मिरवणुका, भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलून जातात. ही बाब लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत ठिकठिकाणचे ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. एकूण ५४ रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आले आहेत. तसेच ५७ रस्ते मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. याशिवाय ११४ ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
दक्षिण विभाग
अ) वाहतुकीस बंद रस्ते : ३१ रस्ते
• कुलाबा वाहतूक विभाग
नाथालाल पारेख मार्ग : बधवार पार्क ते इंदु क्लिनिकपर्यंत
काळबादेवी वाहतूक विभाग
जे. एम. एस. स्ट्रीट जंक्शन : प्रिन्सेस स्ट्रीट ते ठाकूरद्वार
• डी. बी. मार्ग वाहतूक विभाग
जे. एस. एस. रोड : ठाकूरद्वार ते भालचंद्र स्ट्रीट, व्ही. पी. रोड मी. पी. कसले भालचंद्र कंपनी, बी.जे.जे. रोड : एम. एस. रोड (ठाकूरद्वार) ते एम के रोड (चर्नीसोड) पर्यंत, आर.आर. रोड : चर्नी रोड ते पोर्तुगीज चर्च, सी. पी. टँक रोड : सी. पी. टँक ते माधवबागपर्यंत, दुसरा कुंभारवाडा रोड पूर्ण, संत सेना मार्ग, दुसरी सुतारगाल्ली पूर्ण, नानुभाई देसाई रोड पूर्ण, विठ्ठलभाई पटेल मार्ग सी. पी. टँकपासून ते सरदार वल्लभभाई पटेल (प्रार्थना समाज) जंक्शन आणि भडकमकर जंक्शनपर्यंत, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग- डॉ. एन. ए. पुरंदरे मार्ग आणि राजाराम मोहन रॉय मार्ग (प्रार्थना समाज) पर्यंत बंद राहील.
• डोंगरी वाहतूक विभाग
जिनाभाई मुलजी राठोड मार्ग : शिवदास चापसी जंक्शन ते पी. डिमेलो मार्ग जंक्शनपर्यंत, तसेच पंडीता रमाबाई मार्ग : एन. ए. पुरंदरे मार्ग जंक्शन ते न्या. सिताराम पाटकर मार्ग (रोड) पर्यंत बंद राहील.
• नागपाडा वाहतूक विभाग
ना. म. जोशी मार्गः चिंचपोकळी ते खाटाव मिल, बी. जे. मार्ग : सात रस्ता ते खडा पारसी जंक्शनपर्यंत, क्लेअर रोडः खडा पारशी जंक्शन ते नागपाडा बंद, मौलाना आझाद रोडः नागपाडा जंक्शन ते दोन टाकी, बेलासिर रोडः नागपाडा ते मुंबई सेंट्रल जंक्शन, मौलाना शौकत अली रोड- शुक्लाजी स्ट्रीट ते दोन टाकी
• भायखळा वाहतूक विभाग
डॉ. बी. ए. रोड : भारत माता ते बावला कंपाऊंड ( डी.के. रोड जंक्शन) पर्यंत बंद राहील, डॉ. एस. एस. राव रोड : गोपाल नाईकची (शाह) ते लालबाग पोलीस चौकीपर्यंत, दत्ताराम लाड मार्ग : चिंचपोकळीपासून काळाचौकीपर्यंत, सानेगुरूजी मार्गः संत जगनाडे जंक्शन रोड नाक्यापर्यंत, गणेशनगर गल्ली (चिवडा गल्ली), दिनशॉ पेटीट लेन : चव्हाण मसाला ते डॉ. बी. ए. रोडपर्यंत, टी. बी. कदम मार्ग : उडपी हॉटेलपर्यंत, बॅस्टर नाथ पै मार्ग उत्तरवाहिनीवरून श्रावण यशवंते चौकाकडे जाणारी वाहने बंद राहील
• भोईवाडा वाहतूक विभाग
डॉ. ई बोर्जेस मार्ग खानोलकर चौकापर्यंत, जेरबाई वाडीया मार्ग : परळ जंक्शन ते आंबेकर मार्ग बंद राहील
ब) एक दिशा मार्ग:- २९ मार्ग
• कुलाबा वाहतूक विभाग
नाथालाल पारेख मार्ग, कुलाबा : प्रकाश पेठे मार्ग जंक्शनपासून दक्षिणेकडे जाणारा मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग – शहीद भगतसिंग मार्ग आणि नाथालाल पारे मार्गापर्यंत पश्चिमेस बंद राहील
• आझाद मैदान वाहतूक विभाग
महानगरपालिका मार्ग : महापालिका मार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मेट्रो सिनेमा उत्तरवाहिनीवर जाणारा मार्ग बंद राहील.
• काळबादेवी वाहतूक विभाग
जे. एस. एस. रोड प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शन, काळबादेवी रोड : तांबा काटा ते वर्धमान जंक्शनपर्यंत बंद राहील
• डी. बी. मार्ग वाहतूक विभाग
काळबादेवी रोडः तांबा काटा ते किका स्ट्रीटपर्यंत बंद राहील
• डोंगरी वाहतूक विभाग
शिवदास चापसी मार्ग दक्षिणवाहिनी
ताडदेव वाहतूक विभाग
पंडिता रमाबाई मार्ग : सिताराम पाटकर मार्ग जंक्शनपासून नाना चौकपर्यंत, केनेडी ब्रीजः दक्षिण वाहिनी, ग्रँट रोड ब्रिज नाना चौकवरून येणारी वाहतूक, पठ्ठे बापूराव मार्ग हा पूर्वेकडे जाणाऱ्या वाहतुकीस बंद राहील, जावजी दादाजी मार्ग (लाइव रोड) नाना चौकापासून ताडदेवकडे जाणारी मार्गिका, बेलासीस ब्रिजःपश्चिमेकडीकडील मार्ग, फ्रेंच ब्रीजः दक्षिणेकडे जाणारी मार्गिका, वाळकेश्वर मार्गः तीन बत्तीकडून येणारी मार्गिका( फक्त बेस्ट बससाठी सुरू)
• नागपाडा वाहतूक विभाग
मुंबई सेंट्रल ब्रीजः मुंबई सेंट्रल जंक्शन से ताडदेव, डायना ब्रीजः ताडदेवकडून नवजीनपर्यंत, भडकमकर मार्ग : ताडदेवकडून नवजीनपर्यंत, सानेगुरूजी मार्गः चिंचपोकळीकडून सातरस्ता, आनंदराव नायर रोड : सातरस्ताकडून मराठी मंदिर, आर. एस. निकर मार्ग : अलेक्झांडर जंक्शन, चिंचपोकळी ब्रिजः चिंचपोकळी जक्शनपासून सानेगुरूजी मार्गापर्यंत, ना. म. जोशी मार्ग : चिंचपोकळी ते खटाव मार्गावर वाहतुकीस प्रवेश बंद
भोईवाडा विभाग
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग : सरफरे चौकापासून डॉ. बी. ए. नायगाव रोड एकदिशा मार्ग, ग. द. आंबेकर मार्ग : सरफरे चौकपासून संत गोरा कुभार मार्गापर्यंत, डॉ. एस. एस. राव मार्ग : आचार्य दोंदे मार्गापासून हाफकिनपर्यंत, आचार्य दोंदे मार्गः परळ टीटी पासून खानोलकर मार्गापर्यंत, जग्गनाथ भातणकर मार्गः एलफिन्स्टन जंक्शन ते परळ टीटी, करिरोड रेल्वे पुलः भारतमाता जंक्शनपासून सिंगटे मास्तर चौकापर्यंत
क) मालवाहू वाहनांना प्रवेश बंद : २१ मार्ग
खालील नमूद विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाच्य लिखित इतर सर्व मालवाहू वाहनांना प्रवेश बंद राहील.
• काळवादेवी वाहतूक विभाग
जे. एस. एस. रोड, एल. टी. मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, जे. एस. एस. रोड, व्ही. पी. रोड, बी. जे. रोड, आर. आर. रोड, सी. पी. टँक रोड, दुसरा कुंबारवाडा रोड, संत सेना मार्ग, दुसरी सुतार गल्ली, नानुभाई देसाई रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, एस. की. पी. रोड रोड संपूर्ण बंद, लॅमिंग्टन रोड,
गोपाळराव देशमुख रोड, एन. एस. पाटकर मार्ग, लाभाई देसाई मार्ग, वॉर्डन रोड, रामचंद्र भट मार्ग, नेपियन्सी रोड
ड) वाहने उभी करण्यास बंदी : ४९ मार्ग (११.०० वा पासून दुसऱ्या दिवशी पहाटे ०६.०० वा. पर्यंत)
• कुलाबा वाहतूक विभाग
नाथालाल पारेख मार्ग, श्री. प्रकाश पेठे मार्ग
डोंगरी वाहतुक विभाग
जिनाभाई मुलजी राठोड मार्ग
काळबादेवी वाहतूक विभाग
जे. एस. एस. रोड, एलटी मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग
• डी. बी. मार्ग वाहतूक विभाग
जे.एस. एस रोड, व्ही. पी. रोड, बी. जे. रोड, आर. आर. रोड, सी. पी. टँक रोड, दुसरा कुंभारवाडा रोड, संत सेना मार्ग, दुसरी सुतार गल्ली, नानुभाई देसाई रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, एस. व्ही रोड. लॅमिंगटन रोड
ताडदेव वाहतूक विभाग
जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, पंडिता रमाबाई मार्ग, न्या. सिताराम पाटकर मार्ग, ऑगस्ट क्रांती मार्ग
मलबार हिल वाहतूक विभाग
वाळकेश्वर मार्ग, बॅन्ड स्टॅन्ड जंक्शन
• नागपाडा वाहतूक विभाग
ना. म. जोशी मार्ग, सानेगुरूजी मार्ग, बी. जे. रोड, क्लेअर रोड, मौलाना आझाद रोड, मौलाना शौकत अली रोड, नायर रोड, बाबासाहेब भडकमकर मार्ग, आर. एस. निमकर मार्ग
भायखळा वाहतूक विभाग
डॉ. बी. ए. रोड, एस. एस. राव रोड, सानेगुरूजी मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, ग.द. आंबेकर मार्ग
साईबाबा पथ
श्रीकांत हडकर मार्ग, गणेश नगर लेन, दिनशॉ पेटीट लेन, टी. बी. कदम मार्ग, रामभाऊ भोगले रोड, झकेरिया बंदर रोड, बॅ. नाथ पै रोड
• भोईवाडा वाहतूक विभाग
ग. द. आंबेकर मार्ग (सरफरे चौक ते नाना मास्तर चौक), जेरबाई वाडिया मार्ग, ई. बोर्जेस मार्ग
वाहतुकीस बंद ११ रस्ते
• दादर वाहतूक विभाग
रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर मार्ग, जांभेकर महाराज मार्ग, स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, संपूर्ण केसकर रोड, संपूर्ण एम. बी. राउत रोड, टिळक ब्रिज, एस. के. बोले रोड,
• माटुंगा वाहतूक विभाग
एसके बोले रोड (दादर टी.टी)
कुर्ला वाहतूक विभाग
एस. बी. एस. रोड उत्तरवाहिनी, न्यू मिल रोड
ब) एक दिशा मार्ग १० मार्ग
• वरळी वाहतूक विभाग ॲनी बेझंट मार्ग, ना. म. जोशी मार्ग
दादर वाहतूक विभाग
एस.के बोले रोड, स्वातंत्रवीर सावरकर मार्ग
माहिम वाहतूक विभाग
टाकनदास कटारिया मार्ग
माटुंगा वाहतूक विभाग
मंकिकर मार्ग, टिळक मार्ग, डॉ. बी. ए. रोड
• धारावी वाहतूक विभाग
टी. ए. कटेरिया रोड, संत रोहिदास मार्ग
मालवाहू वाहनांना प्रवेश बंद:- १७ मार्ग
गणेश विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व मालवाहू वाहनांना येथे प्रवेश बंद राहील
• दादर वाहतूक विभाग
स्वातंत्रवार मार्ग, गोखले रोड, एस. के. बोले रोड, भवानी शंकर रोड संपूर्ण सत्ता, एन. सी. केळकर रोड, टिळक ब्रिज रोड
• माहिम वाहतूक विभाग
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सेनापती बापट मार्ग रहेगा स्टेशनपर्यंत बंद राहील, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया रोड
• माटुंगा वाहतूक विभाग
टिळक रोड(दादर टीटी जंक्शन)
धारावी वाहतूक विभाग
संत रोहिदास मार्गास मार्ग, टी. ए. कटारिया रोड
• कुर्ला वाहतूक विभाग
एल. बी. एस. रोड, न्यू मिल रोड
• बी. के. सी तू विभाग
वांद्रे कॉम्पलेक्स रोड : फॅमिली कोर्टपर्यंत बंद राहील.
(ड) वाहने उभी करण्यास बंदी : २० मार्ग
वरळी वाहतूक
ॲनी बेझंट रोड, आर. जी. थडानी रोड, ना. म. जोशीमार्ग
दादर वाहतूक
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, एम. बी. राऊत मार्ग, केळूसकर रोड, जांभेकर महाराज मार्ग, एन.सी.केळकर मार्ग, जे. के. सावंत मार्ग, ज्ञानेश्वर मंदिर रोड संपूर्ण सत्ता
• माहिम वाहतूक विभाग टी. एच. कटारिया मार्ग, टायकलवाडी रोड, मनमाला टँक रोड, मोरी रोड
• माटुंगा वाहतूक विभाग
डॉ. बी. ए. रोड
• धारावी वाहतूक विभाग
टी. एच. कटारिया मार्ग
• कुर्ला वाहतूक विभाग
एल. बी. एस. रोड, न्यू मील रोड,
• बी.के.सी वाहतूक विभाग
बीकेसी रोड(कौटुंबिक न्यायालयापर्यंत)
पूर्व उपनगरे विभाग
अ) वाहतूकीस बंद रस्ते १२. रस्ते
चेंबूर वाहतूक विभाग
हेमू कलानी मार्ग, गिडवाणी मार्ग, आर. सी. मार्ग
• देवनार विभाग
घाटला गाव
• मुलुंड वाहतूक विभाग
भट्टीपाडा मार्ग, भांडूप (प), जंगल मंगल मार्ग(भांडूप) लक्ष्मी हॉटेल ते सर्वोदय नगर, पंडीत दिनदयाल उपाध्याय मार्ग, बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (प.) उत्तर वाहिनी, जंगल मंगल रोड टेंबीपाडा रोड जंक्शन ते शिवाजी तलाव, लाल बहादूर शास्त्री मार्ग, सर्वोदय नगर, जंगल मंगल रोड ते शिवाजी तलाव पर्यंत बंद राहील.
पवई वाहतूक विभाग
साकी विहार रोड जंक्शन
मालवाहू वाहनांना प्रवेश बंद: ०३ मार्ग
•चेंबूर वाहतूक विभाग
आर. सी. मार्ग
• घाटकोपर वाहतूक विभाग
लाल बहादूर शास्त्री मार्ग कुर्ला(प)
•पवई वाहतूक विभाग
जे. व्ही. एल. आर. रोड
ड) वाहने उभी करण्यास बंदी. १५ मार्ग
चेंबूर वाहतूक विभाग
व्ही. एन. पुरव मार्ग, हेमू कलानी मार्ग, एम. जी. बर्वे मार्ग, आर. सी. मार्ग, सी. जी. गिडवानी मार्ग, एम. जी. रोडपासून अमर महल, पी. एल. लोखंडे मार्ग
मुलुंड वाहतूक विभाग
भट्टीमार्ग, भांडूप (प.), जंगल मंगल मार्ग, भांडूप (प.), पंडीत उपाध्याय मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (प.) (सिग्नल जंक्शन), जंगल मंगल रोड (टेंबीपाडा ते शिवाजी तलाव), बहादूर शास्त्री मार्ग टँक रोड जंक्शन ते शिवाजी तलाव, सर्वोदय नगर, जंगल मंगल रोड ते शिवाजी तलावापर्यंत बंद राहील.
पवई वाहतूक विभाग
जे. व्ही. एल. आर. रोड
पश्चिम उपनगरे विभाग
अ) वाहतुकीस बंद २० रस्ते
शामराव परुळेकर मार्ग, विलेपार्ले (पश्चिम), जनार्दन म्हात्रे रोड, टागोर रोड, जुहू रोड (लिंकींग रोड उत्तर वाहिनी), जुहू रोड गझदर जंक्शन उत्तर वहिनी, जुहू रोड रिझवी महाविद्यालय दक्षिण वाहिनी, जुहू तारा रोड किशोर गांगुली जंक्शन, जुहू तारा रोड रॉयल हॉटेल जंक्शन, कोळीवाडा जंक्शन,
डी. एन. रोड वाहतूक विभाग
सिझर मार्ग, जे. पी. रोड, पाच मार्ग
दिंडोशी वाहतूक विभाग
आरे मार्ग (आरे कॉलनीमधील संपूर्ण), आरे मार्ग आरे जंक्शन ते पवई फिल्टरपाड, आरे मार्ग जंक्शन ते मरोळ नाका, के. टी. सोनी मार्ग, बाबु बागवे मार्ग (स्थानिक रहिवासी वगळून)
• बोरिवली वाहतूक विभाग
एल.टी. रोड, गोराई जेट्टी रोड
एक दिशा मार्ग:- १५ मार्ग
•सांताक्रुझ वाहतूक विभाग
जुहू तारा मार्ग ट्युलिप स्टार जंक्शन ते एसव्ही रोड, वैकुठलाल मेहता मार्ग, इंद्रवदन ओझा मार्ग, इर्ला सोसायटी मार्ग, गुलमोहर रोड मार्ग, सी. डी. बर्फीवाला रोड, लिंकींग रोड
डी. एन. नगर वाहतूक विभाग
वर्सोवा जे. पी. रोड, पी. के सावंत मार्ग, सीझर मार्ग, गोपाळकृष्ण गोखले ब्रीज
मालाड वाहतूक विभाग
मार्वे रोड, राम मंदिर रोड
• कांदिवली वाहतूक विभाग
के. टी. सोनी मार्ग, स्वामी समर्थ सर्कल जंक्शन ते भारत नगर
क) मालवाहू वाहनांना प्रवेश बंद:- १६ मार्ग
• डी. एन. नगर वाहतूक विभाग
जे. पी. रोड, एस व्ही रोड, सीझर रोड, स्वामी समर्थ सर्कल जंक्शन ते भारत नगर (लिंक रोड ते वर्सोवा जेट्टीपर्यंत)
• ओशिवरा वाहतूक विभाग
लिंक रोड, न्यू लिंक रोड, एस. व्ही. रोड
• मालाड वाहतूक विभाग
मार्वे रोड, एस.व्ही. रोड, अब्दुल हमीद मार्ग
• कांदिवली वाहतुक विभाग
दामू अण्णा दाते मार्ग, कांदिवली गावठाण रोड, के. टी. सोनी मार्ग
• गोरेगाव वाहतूक विभाग
लिंक रोड, एसव्ही रोड, एम. जी. रोड प
ड) वाहने उभी करण्यास बंदी २० मार्ग
• डी.एन. विभाग
पी. के. सावंत मार्ग, जे. पी. रोड बस आगार, सागर कुटीर, क्लासिक बीच, बरिस्ता लेन, सी. डी. बर्फिवाला रोड, सिझर रोड, एस. व्ही. रोड, अच्युतराव पटवर्धन रोड, स्वामी समर्थ ते भारत नगर
ओशिवरा वाहतूक विभाग
लोखंडवाडा बॅक रोड, गोरेगाव वाहतूक विभाग, एम. जी. रोड
• मालाड वाहतूक विभाग
टीएन जंक्शन ते मार्वे
दिंडोशी वाहतूक विभाग
आरे मार्ग आरे कॉलनी, आरे मार्ग आरे जक्शन ते पवई फिल्टर पाडा, आरे मार्ग मरोळ नाका
कांदीवली वाहतूक विभाग
दामूअण्णा दाते मार्ग, एम. जी. रोड, बंदर पाखाडी रोड, के. टी. सोनी मार्ग
•सांताक्रुझ वाहतूक विभाग
जनार्दन म्हात्रे रोड, वैकुंठ मेहता रोड, बिर्ला लेन, जुहू रोड, जुहू तारा रोड
• समता नगर वाहतूक विभाग
आकुर्ली रोड हनुमान नगर, ठाकूर हाऊस ते चक्रवर्ती रोड, आकुर्ली रोड चक्रवर्ती रोड
• बोरिवली वाहतूक विभाग
एल. टी. रोड बंद, गोराई जेट्टी रोड