तीन-चार महिन्यांपासून सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीमुळे खोळंबा

शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावरच गेले अनेक दिवस सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे येथील वाहतूक व्यवस्थेचे सध्या तीन-तेरा वाजले आहेत. दादर पश्चिम येथील न. चिं. केळकर मार्गावर पालिकेने सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, वाहतुकीचे योग्य नियोजन होत नसल्याने या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

गेल्या तीन-चार महिन्यांपासून दादर पश्चिमेला कबुतरखान्याला जोडणाऱ्या न. चिं. केळकर मार्गावर पालिकेच्या जी उत्तर विभागाने जुन्या वाहिनीचे काम हाती घेतले आहे. या मार्गावरील कबुतरखान्यापासून प्लाझा सिनेमा चौकापर्यंतचा सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने जाणारा पूर्ण मार्ग बंद करून त्या ठिकाणी खोदकाम करून वाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्लाझा सिनेमाच्या दिशेने जाणाऱ्या एकाच मार्गावरून दोन्ही बाजूंची वाहतूक कासव गतीने सुरू असते. वाहतुकीचे कोणतेही नियोजन या ठिकाणी होत नसल्याने नियम धाब्यावर बसवत येथे वाहने हाकली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा ताण केवळ इथेच नव्हे तर प्लाझा सिनेमा चौक, दादर टी टी परिसर,भवानी शंकर रोड, रानडे रोड, टिळक पूल येथील वाहतूक व्यवस्थेवरही पडत आहे.

पूर्वी दादर टी टी सर्कल ते सिद्धिविनायक मंदिर हे अंतर कापण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटांचा कालावधी लागत असे. मात्र सध्या हाच मार्ग ओलांडण्यासाठी एक तास खर्च करावा लागतो. सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने मंगळवारच्या दिवशी येथील वाहतूक व्यवस्थेची पार दैना उडालेली असते. आणखी आठ महिने तरी हे काम सुरू राहणार असल्याने या समस्येचा सामना वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही करावा लागणार आहे.

या संपूर्ण परिसरातील कामे पूर्णत्वास येण्यासाठी अजूनही आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शिवाय पावसाळी दिवसांत आम्ही काम बंद करणार आहोत.

रमाकांत बिरादार, सहआयुक्तजी उत्तर विभाग

मी रानडे रोडवर राहते. येथून नक्षत्र येथील भाजीमार्केटपर्यंत चालत जाणेही सध्या रस्त्याच्या कामामुळे –कठीण झाले आहे. नक्षत्र मॉलजवळील रस्त्यावरून दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी चिंचोळ्या गल्लीइतकीच जागा आहे. त्यामुळे तो रस्ता ओलांडण्यासाठी दुतर्फा प्रचंड गर्दी होते.

सावित्री देशपांडे, स्थानिक नागरिक

या मार्गावरून मी नियमित प्रवास करतो; पण गेल्या दोन महिन्यांत प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास मला सहन करावा लागत आहे. सोमवार सोडल्यास इतर प्रत्येक दिवशी दादर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी असते. शिवाय या भागाला इतर पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने याच मार्गाचा वापर करावा लागतो.

शशिकांत पाटील, वाहनचालक

Story img Loader