‘मातोश्री’ निवासस्थानी सोमवारी शुकशुकाट होता. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाऊन अस्थि आणल्यानंतर मातोश्रीकडे फारसे कोणीही फिरकले नाही. शिवसेनाप्रमुखांची तब्येत खालावल्यावर ‘मातोश्री’ निवासस्थानी बॉलिवूड, उद्योगपती, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली होती. दरम्यान, बाळासाहेबांच्या पार्थिवाला खांदा देण्यास मनाई करण्यात आल्याने राज ठाकरे दुखावले गेले. अंत्ययात्रेत पार्थिवापासून काही अंतर ठेवत बराच काळ चालले आणि नंतर घरी गेले. ते थेट अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहिले. त्यामुळे अस्थि गोळा करण्याच्या वेळी ते उपस्थित राहिले नसावेत आणि मातोश्रीवरही गेले नसावेत, अशी चर्चा आहे.
‘मातोश्री’वरील वर्दळ थंडावली
‘मातोश्री’ निवासस्थानी सोमवारी शुकशुकाट होता. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाऊन अस्थि आणल्यानंतर मातोश्रीकडे फारसे कोणीही फिरकले नाही. शिवसेनाप्रमुखांची तब्येत खालावल्यावर ‘मातोश्री’ निवासस्थानी बॉलिवूड, उद्योगपती, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली होती.
First published on: 20-11-2012 at 04:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic reduced on matoshree