मुंबई: दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेवरील वाहतूक मंगळवारी काही वेळ ठप्प झाली होती. तांत्रिक बिघाडामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
दरम्यान महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून तात्काळ हा बिघाड दूर करण्यात आला असून वाहतूक काहीशी विलंबाने सुरु असल्याची माहिती महा मुंबई मेट्रोकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा… नव्याकोऱ्या सीएसएमटी – जालना वंदे भारतमध्ये तांत्रिक बिघाड
मेट्रो २ अ मार्गिकेवर पहिल्यांदाच मोठ्या तंत्रिक बिघाडामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडे जाणाऱ्या मेट्रो गाडीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ३० मिनिटांहून अधिक काळ वाहतूक ठप्प होती. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्याने अनेक प्रवासी रुळावरून चालत गेले. या बिघाडाबाबत अनेक प्रवाशांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतरही बराच वेळ मेट्रो मार्गिकेवरील वाहतूक विलंबाने सुरू होती.