पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी खासगी आणि शिवनेरी बसमध्ये विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बस बंद पडल्याने ती खालापूर टोलनाक्याजवळ उभी होती. या बसमधील प्रवाशांना पुढे नेण्यासाठी डेपोमधून दुसरी बस मागविण्यात आली होती. दुसरी बस बंद पडलेल्या बसच्या मागे उभी असतानाच एका खासगी प्रवासी बसने तिला धडक दिली. यामुळे शिवनेरी बसने पुढील बंद पडलेल्या बसला टक्कर दिली. यामध्ये शिवनेरी बसचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवनेरी बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे कोणालाही जखम झालेली नसल्याचे कळते. या घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली.
एक्स्प्रेस वेवर खासगी आणि शिवनेरी बसमध्ये विचित्र धडक
सुदैवाने या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-07-2016 at 14:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tragic accident of shivneri bus on express way