पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी खासगी आणि शिवनेरी बसमध्ये विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बस बंद पडल्याने ती खालापूर टोलनाक्याजवळ उभी होती. या बसमधील प्रवाशांना पुढे नेण्यासाठी डेपोमधून दुसरी बस मागविण्यात आली होती. दुसरी बस बंद पडलेल्या बसच्या मागे उभी असतानाच एका खासगी प्रवासी बसने तिला धडक दिली. यामुळे शिवनेरी बसने पुढील बंद पडलेल्या बसला टक्कर दिली. यामध्ये शिवनेरी बसचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवनेरी बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे कोणालाही जखम झालेली नसल्याचे कळते. या घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा