लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईः आरे सब पोलिसांच्या हद्दीत ट्रेलरने दुचाकीस्वाराचा चिरडले. आपघातानंतर जखमी दुचाकीस्वाराला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रेलर चालकाविरुद्ध आरे सब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीरज गुप्ता असे मृताचे नाव आहे, तो मालाड येथील रहिवासी होता. मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीत तो तंत्रज्ञ पदावर कार्यरत होता. रविवारी गुप्ता दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी अंधेरी (पूर्व) येथील जेव्हीएलआर रोडवर गुप्ता यांचा अपघात झाला.

आणखी वाचा-मालवणी आरोग्य केंद्राचे रखडलेले काम पुन्हा सुरू होणार, खर्च ३ कोटींनी वाढला

गुप्ताचा भाऊ धीरज याला अपघाताबाबत पोलिसांकडून माहिती मिळाली. त्यानंतर धीरज घटनास्थळी पोहोचला, तेव्हा त्याचा भाऊ ट्रेलरच्या मागच्या चाकात अडकल्याचे त्याला दिसले. ट्रेलरच्या मागील टायरमधून जखमीला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना क्रेन आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करावे लागले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

अखेर जखमी गुप्ता यांना बाहेर काढण्यात आले. त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याला तातडीने जोगेश्वरी ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रेलरचा चालक आपले वाहन घटनास्थळावर सोडून पळून गेला. धीरजच्या तक्रारीवरून पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trailer crushed the biker mumbai prit news mrj