भरधाव जाणाऱ्या एका ट्रेलरच्या धडकेने माझगाव एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी ट्रेलर चालकाला अटक केली आहे.माझगावच्या नारियलवाडी दफनभूमीजवळ राहणारी आयेशा अली (२६) ही महिला सकाळी आपल्या घराजवळील रस्त्यावरून जात होती. फिट आल्याने अचानक ती खाली पडली. त्याचवेळी  भायखळ्याहून माझगावच्या दिशेने जात असलेल्या ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली ती सापडली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा