मुंबई : नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी मुंबईकर कोकण, गोव्याला जायला सज्ज झाले असून कोकणात जाणाऱ्या वंदे भारतसह इतर सर्व नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण १०० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. डिसेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांचे नाताळ आणि नववर्ष गोव्याच्या किनारी साजरा करण्यासाठीचे नियोजन सुरू होते. यंदाही, कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यास, नागरिकांची धावपळ सुरू आहे. ऑनलाइन संकेतस्थळावरून आणि तिकीट खिडक्यांवरून जलदगतीने तिकिटांचे आरक्षण सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी कुटुंबीयांसह कोकण आणि गोव्याच्या किनारी सुट्ट्या साजरे करण्याचे बेत आखले आहेत. त्यासाठी, रेल्वेला पहिली पसंती देऊन आगाऊ आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी कुटुंबीयांसह कोकण आणि गोव्याच्या किनारी सुट्ट्या साजरे करण्याचे बेत आखले आहेत. त्यासाठी, रेल्वेला पहिली पसंती देऊन आगाऊ आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे.