लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी – भायखळ्यादरम्यान अप जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत सोमवारी दुपारी ४.३० वाजता बिघाड झाला. त्यामुळे साएसएमटी – भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

आणखी वाचा-मुंबई : रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे सीएसएमटी – भायखळा स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. कार्यालये सुटण्याची वेळ असल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली. दरम्यान, बिघाडाची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम हाती घेतले. मात्र लोकल सेवा विस्कळित झाल्यामुळे प्रवाशांना घर गाठण्यात गैरसोय होत आहे. काही वेळानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.