मुंबईत पावसाच्या संततधारा सुरू झाल्यावर काही कालावधीतच सखल भागात पाणी साचते. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. त्यामुळे पावसाळ्यात आणि रेल्वे रुळावर पाणी साचल्यास कशाप्रकारे लोकल, एक्स्प्रेस चालवावी याचे प्रशिक्षण सीएसएमटीत उभारलेल्या सिम्युलेटर यंत्रणेद्वारे मोटरमन आणि लोको पायलट यांना देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> आडमुठ्या झोपडीधारकांमुळे पुनर्वसनाला विलंब नको; उच्च न्यायालयाचे आदेश

Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
local express train got disrupted due to traffic jam at diva railway crossing gate
दिवा रेल्वे फाटकातील वाहन कोंडीमुळे  लोकल, एक्सप्रेस खोळंबल्या; शिळफाटा वाहन कोंडीत
without helmet officers and employees should be banned from pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव
pune police return lost mobile sets to citizens on diwali occasion
दिवाळीत पोलिसांची अनोखी भेट; गहाळ झालेले मोबाइल संच नागरिकांना परत
Vajra shot india made
शत्रूच्या ड्रोन्सचा नायनाट करायला ‘वज्र गन’ सज्ज; काय आहे याचं महत्त्व व वैशिष्ट्य?
pune cops intensify action against drunk drivers
शहरबात : वेगाची ‘नशा’ उतरणार का?

लोको पायलट, मोटरमनचे रेल्वेगाडी चालवण्याचे कौशल्य अधिक सुधारण्यासाठी सीएसएमटी येथे सिम्युलेटर उभे केले आहेत. सिम्युलेटर यंत्रणेमुळे अनेक वास्तववादी परिस्थितीत रेल्वे चालविण्याचा प्रात्यक्षिकासह अनुभव मोटरमनला मिळतो. या प्रशिक्षणामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवासही अधिक सुरक्षित होणार असल्याचे मत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले.

मध्य रेल्वेवर पावसाळ्यात अनेक स्थानकांदरम्यानचे रेल्वे रूळ पाण्याखाली जातात. त्यावेळी अत्यंत सुरक्षितपणे रेल्वे कशाप्रकारे चालवण्यात यावी, याचे प्रशिक्षण लोको पायलट, मोटरमनला सिम्युलेटर सिस्टमद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच ट्रेस पासिंग, आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे कशी चालवावी याचे प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> दहिसर व मालाड येथे दोन अपघातात तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये दोन लहान मुलींचा समावेश

‘आरएस व्हॉल्व्ह’ सिम्युलेटर प्रणालीद्वारे लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट या दोघांनाही आपत्कालीन ब्रेकिंगचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक सुरक्षितपणे होते, अशी माहिती अशी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

काय आहे सिम्युलेटर यंत्रणा

मोटरमन, लोको पायलटच्या केबिन प्रमाणे एक यंत्रणा तयार केली जाते. मोटरमन, लोको पायलटला प्रात्यक्षिक रेल्वे गाडी चालविण्याचा अनुभव या यंत्रणेतून दिला जाते. या यंत्रणेतून वेगमर्यादा, सिग्नल यंत्रणेच्या सूचना, आपत्कालीन वेळी कोणते काम करावे, याचे प्रशिक्षण दिले जाते.