‘लोकसत्ता लोकांकिका’साठी ठाणे, मुंबईच्या महाविद्यालयांची जोरात तालीम

‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धेचा महाअंतिम फेरीचा पडदा उघडण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. ठाणे विभागीय अंतिम फेरीतून प्रथम क्रमांक पटकविलेल्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आणि मुंबई विभागातून महाअंतिमफेरीत दाखल झालेले सिद्धार्थ महाविद्यालय, आनंदभवनचे तरुण कलाकार सध्या शेवटच्या तालमीत मग्न आहेत. उत्कृष्ट संवाद सादरीकरण, प्रकाशयोजना, संगीत अशा पातळ्यांवर जोरदार तयारी सुरू आहे. एकांकिकेतील बारकावे अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी कलाकार कसोशीने मेहनत घेत आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

ठाणे विभागातून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाकडून ‘चौकट’ ही एकांकिका महाअंतिमफेरीसाठी निवडण्यात आली आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयातील कलाकारांनी तीन वेळा ‘लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत जाण्याचा मान पटकविला आहे. महाअंतिम फेरीमध्ये ठाणे विभागाचे नाव कोरले जावे यासाठी तालमीत अभिनयातील बारकाव्यांवर काम करणे सुरू असल्याचे ‘चौकट’ एकांकिकेचा दिग्दर्शक मनीष साठे याने सांगितले. या एकांकिकेत मुख्य कलाकारांसह इतर विद्यार्थी कलाकारांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. एकांकिकेतील मोर्चेबांधणीतील दृश्यात या सर्वाचा एकत्रित आवाज परिणामकारक असणे गरजेचे आहे. याशिवाय अभिनयातील पात्राला स्वत:मध्ये गुंतवून अभिनय करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्य कलाकर पूजा कांबळे हिने सांगितले. तर आरक्षणासारखा नाजूक विषय हाताळत असल्याने कोणत्या शब्दावर अधिक जोर द्यावा आणि कोणत्या शब्दावर जोर दिल्याने चुकीचा अर्थ निघू शकेल याची काळजी घ्यावी लागत आहे. नेपथ्यामध्ये महापुरुषांचे पुतळे असल्याने अभिनय करताना अनवधानाने त्यांची विटंबना होणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. याशिवाय अभिनय करताना लागणारी ऊर्जा, एका दृश्यानंतर वाढत जाणारी एकांकिका अशा लहान लहान गोष्टींवर काम सुरू आहे.

मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिद्धार्थ महाविद्यालय आनंदभवनच्या ‘देव हरवला’ या एकांकिकेसाठीही तरुण अशाच प्रकारची मेहनत घेत आहेत. महाअंतिम फेरीसाठी नेपथ्य अधिक उठावदार करण्याचे प्रयत्न तालमीच्या वेळी सुरू आहेत. सर्व कलाकारांच्या परीक्षा संपल्याने आता पालकही तालमीला येण्यापासून अडवत नाहीत. त्यामुळे तालमीतला उत्साह पाहण्यासारखा आहे. तालमीच्या शिस्तीसाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे तालमीला आलेल्या कोणाचीही चप्पल इकडे-तिकडे पडलेली दिसत नाही. सगळ्या चपला एका रांगेत असतात. बॅगांसाठीही तोच नियम. कोणते नेपथ्य कोणत्या विंगेत ठेवायचे, किती वेळात काढायचे याचा कसून सराव ही मुले करतात. एकांकिकेतील प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेतच पार पडावी असा प्रयत्न असतो. तालीम तेव्हाच चांगली होते जेव्हा ती आनंदी मनाने केली जाते. त्यासाठी तालमीतले वातावरण गंभीर असून चालत नाही. ते कायम हसते-खेळते असावे लागते, असे अनिकेत देवकर याने सांगितले.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टीमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. अस्तित्वच्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी ‘झी मराठी’ हे टेलिकास्ट पार्टनर आणि ‘एबीपी माझा’ हे न्यूज पार्टनर आहेत.

Story img Loader