एसटी महामंडळातील ६६ हजार वाहक आणि चालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. एसटीमध्ये आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष झाले होते.
एसटीच्या उत्पन्नात वाहक आणि चालकांचा मोठा सहभाग आहे. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांना प्रभावीपणे हे प्रशिक्षण दिले गेले नव्हते. त्याचा परिणाम प्रवासी संख्या कमी होण्यात व उत्पन्नावर झाला होता. त्यामुळे एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी मार्च २०१५ पर्यंत १ हजार वाहक/चालकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
वाहक आणि चालकांच्या कामगिरीत सुधारणा, मानसिकतेत बदल, प्रामाणिकपणा, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागणूक आदींबाबत हे प्रशिक्षण दिले जाते. आठवडय़ातून तीन दिवस चालक आणि तीन दिवस वाहक यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.