मुंबई : कोकण रेल्वेवरील कारवार- हारवाड विभागादरम्यान पायाभूत बांधकामासाठी २१ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा एक ते दोन तास प्रवास रखडणार आहे. कारवार – हारवाड विभागादरम्यान भुयारी पुलाचे बांधकाम करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान आणि १ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते दुपारी ४.३० दरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शहर भागातील रस्ते कामे रखडलेलीच, पहिल्या टप्प्यातील कामांना अद्याप सुरुवात नाही

२१ नोव्हेंबरच्या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक ०९००५७ उधना – मंगळुरू रेल्वेगाडी आणि १ डिसेंबरच्या ब्लाॅकमुळे गाडी क्रमांक ११०९७ पुणे – एर्नाकुलम एक्स्प्रेस मडगाव – कारवार स्थानकादरम्यान सुमारे २ तास थांबवण्यात येणार आहे. तर, २१ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०६६०१ मडगाव – मंगळुरू रेल्वेगाडी मडगाववरून दुपारी २.१० वाजता सुटण्याऐवजी दुपारी ३.१० वाजता सुटेल. त्यामुळे या रेल्वेगाडीला एक तास विलंब होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trains will be delayed due to block on konkan railway mumbai print news zws