मुंबईः भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी गृहविभागाकडून काढण्यात आले असून त्यात मुंबईला तीन नवे उपायुक्त मिळाले आहेत. पंकज देशमुख, निमित गोयल, सुधाकर बी. पाठारे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबईतील उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर उपायुक्तपदी, तर राजतिलक रौशन यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य या पदावर बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ; २० अतिरिक्त फेऱ्या

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Sanjay Raut
Sanjay Raut : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”

हेही वाचा – अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाची दुसरी तुळई बसवण्याच्या कामाला सुरुवात

याशिवाय संदीप गिल्ल यांची पुणे ग्रामीण अधीक्षक, विजय चव्हाण यांची पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या (सोलापूर) प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे. तसेच भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची पोलीस उपायुक्त नागपूर शहर, रोहिदास पवार यांची पुणे लोहमार्ग अधीक्षक, लक्ष्मीकांत पाटील यांची सायबर सुरक्षा अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ८ अधिकाऱ्यांना तसेच कनिष्ठ श्रेणीतील ८ भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे.