मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य पोलीस मुख्यालयाने मुंबईबाहेर बदली केलेल्या अधिकाऱ्यांपैकी १५५ पोलीस निरीक्षकांची मुंबईत पुन्हा बदली करण्यात आली आहे. पण अकोला, लातूर आणि नागपूर येथे बदली करण्यात आलेले १० ते १५ अधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सुटीवर गेले होते. त्यामुळे महासंचालक कार्यालयाने त्यांना जुन्या ठिकाणी कामावर हजर होईपर्यंत कार्यमुक्त करायला नकार दिला आहे.

राज्य पोलीस मुख्यालयाने ३० ऑक्टोबरला एकूण ३३३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या १६१ अधिकाऱ्यांच्या मुंबईबाहेर बदल्या केल्या होत्या. यातील काही अधिकाऱ्यांनी मॅट आणि काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. निवडणुकीनंतर मुंबईबाहेर बदली झालेले अधिकारी पुन्हा मुंबईत परतण्याची आस लावून बसले होते. अखेर, राज्य पोलीस मुख्यालयाने बुधवारी २१५ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले. मुंबईबाहेरील १५५ अधिकारी परत आले. तर, राज्य पोलीस दलातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, नागरी हक्क संरक्षण अशा विभागांमधून मुंबईत नियुक्ती केलेल्या ११२ पोलीस निरीक्षकांपैकी ६० अधिकाऱ्यांच्या त्यांच्या स्वेच्छेने पुन्हा जुन्या नियुक्तीच्या ठिकाणी परत बदली करण्यात आली आहे. त्यांनी जबाबदारी स्वीकारली. पण त्यानंतर ते अधिकारी सुट्टीवर गेले.

Story img Loader