लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाने राज्यातील २८ सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पोलीस दलातील १७ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी हे आदेश जारी केले. तसेच या नव्या आदेशानुसार मुंबईला १२ नवे एसीपी मिळाले आहेत. आदेश मिळताच सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी रूजू व्हावे लागणार आहे.

Maharashtra assembly election
बंडखोर लढण्यावर ठाम, नेत्यांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न; जागावाटपाच्या घोळामुळे बंडाळी अटळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
Breaking: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली; मतदान १५ दिवसांवर असताना मोठी घडामोड!
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्याची सूचना निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिल्या आहेत. नुकतीत राज्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी गृहविभागाचे राज्य पोलीस दलातील २८ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यात मुंबईतील १७ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे.

आणखी वाचा-बंडखोर लढण्यावर ठाम, नेत्यांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न; जागावाटपाच्या घोळामुळे बंडाळी अटळ

नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश अशोकराव गावडे यांची मुंबईत, दहिसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर विश्‍वनाथ गायके यांची नवी मुंबईत, खेरवाडी विभागाचे सुहास पांडुरंग कांबळे यांची नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपअधिक्षक, मुलुंड विभागाचे रवींद्र शंकरराव दळवी यांची मरोळमध्ये, पोलीस प्रशिक्षण विभागाच्या पोलीस उपअधिक्षक, देवनार विभागाचे संजय दामोदर डहाके यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस उपअधिक्षक, सांताक्रूझ विभागाचे महेश नारायण मुगुटराव यांची नाशिक गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस अधिक्षक, भोईवाडा विभागाच्या कुमुद जगन्नाथ कदम यांची नाशिक महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस उपअधिक्षक, वरळी विभागाचे अविनाश प्रल्हाद पालवे यांची पुणे महामार्ग पथकाच्या पोलीस उपअधिक्षक, पायधुनी विभागाच्या ज्योत्सना रासम यांची रायगडच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक, साकिनाका विभागाचे सूर्यकांत गणपत बांगर यांची छत्रपती संभाजीनगर मनमाड लोहमार्ग उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी (मनमाड), पुणे महामार्ग सुरक्षा पथकाचे गजानन बाळासाहेब टोम्पे यांची रायगड पेण उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, माटुंगा विभागाचे मृत्यूंजय धनजय हिरेमठ यांची कोल्हापूर पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षक, चेंबूर विभागाच्या रेणुका शुभराज बुवा होनप यांची नाशिकच्या विशेष महानिरीक्षकाचे वाचक, दादर विभागाचे शशिकांत शंकर माने यांची नवी मुंबईतील कोकण भवन, गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक, खंडाळा पोलीस प्रशिक्षण विभागाच्या प्रेरणा कट्टे, मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भानुदास विश्‍वनाथ खटावकर, नाशिक गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपअधिक्षक, छत्रपती संभाजीनगर, मनमाड लोहमार्ग उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती शंकर पंडित, नाशिक महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रदीप भिवसेन मैराळे, ठाणे महामार्ग सुरक्षा पथकाचे विजय चिंतामण डोळस, रायगड महामार्ग सुरक्षा पथकाचे धनश्याम विजय पलंगे, कोल्हापूर मुख्यालयाचे प्रिया नानासाहेब पाटील, नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संदीप दौलत मोरे, नवी मुंबईतील कोकण भवन, गुन्हे अन्वेषण विभागाचे तन्वीर अहमद अब्दुल समद शेख, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची वाचक रामराव त्र्यंबक ढिकले यांची यांची मुंबई शहरात बदली करण्यात आली तर आग्रीपाडा विभागाचे राजू लक्ष्मण कसबे, विक्रोळी विभागचे दिनकर गंगाधर शिलवटे यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.