मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला मुहुर्त मिळाला आहे. राज्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांची शुक्रवारी नवीन ठिकाणी नियुक्ती करण्यात आली.
गृहमंत्रालयाने दिलेल्या बदली आदेशानुसार परभणीतील गंगाखेड येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांची राज्यपालांच्या परिसहाय्यक पदी, तसेच पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले जयंत मीना यांची नागरी हक्क संरक्षण, नांदेड अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्गचे अधीक्षक पवन बनसोड यांची यवतमाळ पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता सौरभकुमार अग्रवाल हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पद सांभाळतील. जी.ए. श्रीधर यांचीही हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर ठाणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांची मुंबईत उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.
गृह विभागाच्या नव्या आदेशानुसार, शहाजी उमप यांना नाशिक ग्रामीण अधीक्षक पदभार तात्काळ स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. सप्टेंबर,२०२१ मध्ये त्यांची नाशिक ग्रामीण अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे नाशिक ग्रामीणचे अधीक्षक सचिन पाटील यांना आता गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद येथील कार्यभार स्वीकारावा लागेल. गुरूवारीही गृहविभागाने भारतीय पोलीस सेवेतील २३ आणि राज्य पोलीस सेवेतील २ अशा एकूण २५ अधिकाऱ्यांना बदल्या केल्या होत्या.