मुंबई : वायव्य मुंबईत तृतीयपंथीही लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचारात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी १०० हून अधिक तृतीयपंथी उतरले आहेत. रविवारी १२ मे रोजी दिंडोशी विधानसभेत तृतीयपंथीयांनी घरोघरी जाऊन वायकर यांच्या प्रचाराला सुरूवात केली.

पश्चिम उपनगरात तृतीयपंथीयांची संख्या मोठी असून या समाजातील लोकांचे प्रश्नही अनेक वर्षांपासून सोडवलेले नाहीत. अगदी मूलभूत सुविधांपासून हा वर्ग वंचित आहे. निवडणूकीच्या निमित्ताने या वर्गाने आपल्या समस्या उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आहे. गेल्याच आठवड्यात याच भागातील काही तृतीयपंथी संघटनांनी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांची भेट घेतली होती व आपल्या समस्या मांडल्या होत्या. तर काही संघटनांनी वायकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर वायकर यांनी या तृतीयपंथीयांना आपल्या प्रचारात सामावून घेतले आहे. रविवारी तृतीयपंथीयांनी सायंकाळी ५ ते ७ या वेळात क्रांतीनगर, रामलीला मैदान ते इंदिरानगर या भागात वायकरांचा प्रचार केला.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

हेही वाचा…मुंबई : पावणे सहा कोटींच्या सोन्यासह चौघांना अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई, आरोपींमध्ये तीन परदेशी महिला

तृतीयपंथीयांसाठी कुठेच शौचालयाची व्यवस्था नसल्याची समस्या काही महिन्यांपूर्वी तृतीयपंथीयांनी वायकर यांच्याकडे मांडली होती. तेव्हा वायकर यांनी तातडीने गोरेगाव (पूर्व) आरे चेक नाका येथे उभारलेल्या उद्यानामध्ये तृतीयपंथीसाठी शौचालय उभारले. त्यामुळे तृतीयपंथीयांनी वायकर यांचा प्रचार करण्याचे ठरवले आहे. महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच तृतीयपंथीयांनी रवींद्र वायकर यांची भेट घेतली होती. नुसती भेट न घेता त्यांच्या समवेत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यानुसारच द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टच्या १०० पेक्षा जास्त तृतीय पंथी, महिला व पुरूष तसेच मुलं आणि मुली असे मिळून सुमारे १००० जण रविवारच्या प्रचारात सहभागी झाले होते.

Story img Loader