ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ऐरोली ते ठाणे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. आज दुपारी पावणेएकच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली होती. ट्रान्सहार्बर मार्गावर लोकलची रांग लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. अनेक लोक रेल्वेतून उतरुन पायी स्टेशन गाठत असल्याचे चित्र होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
First published on: 30-06-2018 at 14:01 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transharbour stop overhead wire break