मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाची आवश्यकता त्यांच्याकडे मांडणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्लीत उद्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लक्ष्य प्राप्तीच्या दृष्टीने नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ही मागणी करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ‘केबल कार’ प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ‘पर्वतमाला परियोजना’ अंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी अथवा केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक भागीदारीने रोप वे विकसित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>१५ दिवसांत पालिकेने शिवाजी पार्क मैदानातील धूळीबाबत कार्यवाही करावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षाचे आदेश

प्रकल्प राबवणे आवश्यक का?

मुंबई महानगराचे भौगोलिक स्थान, सागरी किनारा खाडीचा प्रदेश, एलिफंटासारखी प्राचीन लेणी, माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर अभयारण्यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्राच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘केबल कार’ प्रकल्प राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transport minister pratap sarnaik proposal regarding the cable car project mumbai news amy