मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाअंतर्गत (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) मुंबई आणि नवी मुंबई शहराची जोडणी आता पूर्ण झाली असून पुढील काम पूर्ण करत डिसेंबरमध्ये हा सागरी सेतू वाहतुकीस खुला होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर हा सागरी सेतू वाहतुकीस खुला झाल्यास मुंबई ते नवी मुंबई अंतर दीड-दोन तासाऐवजी केवळ २० मिनिटांत पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हा सागरी सेतू म्हणजे केवळ सागरी सेतू नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा मार्ग असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुंबई आणि नवी मुंबई शहरांना थेट जोडत या दोन्ही शहरांतील प्रवासाचे अंतर दीड ते दोन तासांऐवजी केवळ २० ते २२ मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई पारबंदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. २०१९ पासून या प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे. मागील दोन वर्षांत या प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला वेग देत नोव्हेंबर २०२३ मध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या मुंबई शहर (शिवडी) आणि नवी मुंबई (शिवाजीनगर) दोन्हींना जोडणाऱ्या २२ किमीच्या संपूर्ण सागरी सेतूचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचा आढावा बुधवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतला. अंत्यत कठीण आणि आव्हानात्मक काम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे कौतुक केले.

Cm Devendra Fadnavis in loksatta events
‘वर्षवेध’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन; स्पर्धा परीक्षांचा ‘वाटाड्या’ पूर्णपणे नव्या स्वरूपात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Budget 2025 Mumbai Municipal Administration How much funds for BEST Mumbai news
बेस्ट प्रशासनाचे पालिका अर्थसंकल्पाकडे डोळे; दोन हजार कोटींची मागणी पूर्ण होणार का?
pune district transport marathi news
पुणे : जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतुकीसाठी तीस वर्षांचा आराखडा, १.२६ लाख कोटींचा खर्च अपेक्षित
Extension of toll concession on Atal Setu Mumbai news
अटल सेतूवरील टोल सवलतीला मुदतवाढ; आणखी वर्षभर २५० रुपयेच पथकर
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!
Traffic block again on Mumbai-Pune Expressway
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक ब्लॉक, वाहतूक अन्य मार्गाने वळवणार
Arbitrator hearing on objections of 1062 farmers in Naina area
नैना क्षेत्रातील १०६२ शेतकऱ्यांच्या हरकतींवर लवादाकडून सुनावणी

या प्रकल्पामुळे मुंबईवरून नवी मुंबईच नव्हे तर पुढे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाणेही सोपे होणार आहे, कारण हा सेतू द्रुतगती मार्गाशी जोडला जाणार आहे. तसेच नवी मुंबई विमानतळ, जेएनपीएलाही वेगाने जाता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भविष्यात अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिकेशीही सागरी सेतू जोडला जाणार असल्याने हा प्रकल्प सामाजिक-आर्थिक विकास साधणारा प्रकल्प ठरणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तर समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई पारबंदर प्रकल्पही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाचा शुभारंभ केलेला आणि त्यांच्याच हस्ते लोकार्पण होणारा प्रकल्प असणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या प्रकल्पात पर्यावरणाला कुठेही धक्का पोहचविण्यात आलेला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या सागरी सेतूसाठी ८५००० मे. टन ऑर्थोट्रॉपिक स्टील वापरण्यात आले आहे. ७४७ विमानांइतके हे स्टील आहे. तर पृथ्वीला चार प्रदक्षिणा होतील इतक्या प्रिस्ट्रेसिंग वायरचा वापर करण्यात आल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा प्रकल्प असणार असल्याचे म्हणत त्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.

पहिल्यांदा सागरी सेतूवरून वाहने धावली!

प्रकल्पातील संपूर्ण सागरी पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने आता सागरी सेतूवरून वाहने नेता येऊ लागली आहेत. त्यानुसार बुधवारी पहिल्यांदा मोठय़ा संख्येने या सागरी सेतूवरून वाहने धावली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनीही सागरी सेतूवरून प्रवासाचा आंनद घेतला. दरम्यान, सागरी सेतूवरून वाहने धावू शकणार असल्याने एमएमआरडीएलाही मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता बांधकाम साहित्य नेणे सोपे होणार आहे. त्यामुळे जी उर्वरित कामे बाकी आहेत ती आता वेगाने पुढे जातील, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.

Story img Loader